Home नागपूर पक्षाची संघटन बांधणी करून पक्षाची ताकत उभारा.

पक्षाची संघटन बांधणी करून पक्षाची ताकत उभारा.

मनसेचे नवनियुक्त नेते राजू उंबरकर यांचे पक्षाच्या पूर्व विदर्भ बैठकीत पदाधिकाऱ्यांना आवाहन.

नागपूर :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पूर्व विदर्भात पक्षाचा मोठा नेता नसल्याने पक्षाची राजकीय ताकत उभी राहली नाही पण काही मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन पक्षाला छोट्या मोठ्या आंदोलनातून पक्ष जिवंत ठेवले होते, दरम्यान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी पूर्व विदर्भात पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाचे पश्चिम विदर्भ नेते राजू उंबरकर यांची पक्षाच्या नेते पदी नियुक्ती करून त्याच्याकडे विदर्भाची धुरा दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी नुकतिच गुडीपाडवा मेळाव्याच्या आदल्या दिवशी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची पक्षाच्या नेते पदी नियुक्ती केली केल्यानंतर त्यांनी दिनांक 9 एप्रिलला पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथील हॉटेल स्ट्रीटडेल सूट्स येथे बैठक घेतली. या बैठकीत मनसे नेते राजू उंबरकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे संघटन वाढवा व पक्ष मजबूत करा असे आवाहन करून यासाठी माझी जिथे कुठे मदत लागेल ती मी देण्यास तयार आहे अशी ग्वाही दिली, यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, किशोर सराईकर नागपूर शहर अध्यक्ष चंदूभाऊ लाडे, विशाल बडगे, शहर सचिव महेश जोशी, शाम पुनियानी व इतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष उपस्थित होते,

या बैठकीत पूर्व विदर्भाच्या सहाही जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या तर काहींनी समस्यांचा पाढा वाचला मात्र मनसे नेते राजू उंबरकर यांनी पक्षाचे ध्येयधोरण कसे आहे, आपण पक्ष मजबूत करण्यासाठी काय करावे, प्रस्थापितांच्या विरोधात आपली पक्षाची ताकत कशी उभी करायची याबद्दल मार्गदर्शन करून पूर्व विदर्भात पुण्या मुबंईच्या तुलनेत आपला विदर्भात पक्ष मजबूत करू व राजसाहेब ठाकरे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास खरा ठरवू असा विश्वास व्यक्त केला.

Previous articleस्वा. सावरकरांच्या सन्मानार्थ चंद्रपुरात पेटल्या मशाली
Next articleगुड फ्रायडे निमित्त निघालेल्या रन ऑफ जीसस रैलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जगीं स्वागत करत शितपेयाचे वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here