Home भद्रावती भद्रावती मधे हिंदूं देवीदेवतांच्या नावाने धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

भद्रावती मधे हिंदूं देवीदेवतांच्या नावाने धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या येणाऱ्या जयंती निमित्य केलेल्या वादग्रस्त पोस्ट ने उडाली खळबळ.

भद्रावती प्रतिनिधी :-

महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या त्या त्या समाजाच्या उत्सवाचा भाग जरी असला तरी इतर महापुरुष किंव्हा देवीदेवतांच्या नावाने अपमानास्पद पोस्ट सामाजिक माध्यमांवर टाकणे म्हणजे हा धार्मिक उन्माद आहे व  सार्वजनिक शांतता भंग करण्याचा गुन्हा आहे हे  माहीत असतांना काही आंबटशौकिन, समाजकंटक हे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असाच प्रकार काल  भद्रावती येथे घडला असून 14 एप्रिल च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य एका समाजकंटकांनी फेसबुक वर लिहिलेल्या पोस्ट मुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाल काशीराम बोरकर, रा भंगाराम वार्ड यांनी त्यांच्या vishal kashiram borkar या फेसबुक आयडी वरून “बजा दो डंका दुनिया के 133 करोड देवी देवताओ के बाप का जन्म दिन आ रहा है 14 एप्रिल अम्बेडकर जयंती.” असे लिहिले व ही पोस्ट हजारो उजर्सनी पहिली त्यात पवण झुंबरलालजी हुरकट, वय 48 वर्ष, जातः मारवाडी रा. गुरू नगर, भद्रावती जि. चंद्रपुर यांनी या पोस्ट वर आक्षेप घेऊन भद्रावती पोलीस स्टेशन मधे विशाल काशीराम बोरकर, यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पवण झुंबरलालजी हुरकट, यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की ते ट्रान्सपोर्ट चे काम करतात व विशाल काशीराम बोरकर, रा भंगाराम वार्ड, भद्रावती हा कॅटरींगचा व्यवसाय करीत असुन तो माझे ओळखीचा आहे. सद्या मी रिअल- मी कंपनीचा RMX 3205 अँड्रॉइड फोन मागील 1 वर्षापासुन वापरत आहे. फेसबुकवर pawan hurkat या नावाने माझी फेसबुक आयडी आहे. त्यावर विशाल बोरकर हा माझे फ्रेंडलिस्टमध्ये vishal kashiram borkar या नावाने आहे. दिनांक 29.03.2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सार्वजनिक बसस्टैंड वर रामनवमिचा देखावा उभारतांना विशाल बोरकर याने वादविवाद केला होता. त्यावेळी त्याने जाहिरपणे माफी मागीतली होती.

दिनांक 10.04.2023 रोजी सकाळी 10.26 वा दरम्यान ते हनुमान मंदीर, शिंदे हॉस्पीटल जवळ, भद्रावती येथे। पुजा करून त्यांचे मोबाईलवर माझे फेसबुक अकाउंट उघडले असता त्यांना त्यावर vishal kashiram borkar या फेसबुक आयडी वरून बजा दो डंका दुनिया के 133 करोड देवी देवताओ के बाप का जन्म दिन आ रहा है 14 एप्रिल अम्बेडकर जयंती असे लिहलेले दिसले. त्यामुळे त्यांच्या सामाजिक व धार्मीक भावना दुखावल्याने त्यांनी मोबाइलवरून स्क्रिनषाँट काढला. तसेच आकाश वानखेडे याने सुध्दा सदरची पोस्ट पाहली आहे. त्यावर ते सगळे मिळुन पोलीस स्टेशन, भद्रावती येथे विशाल बोरकर विरूध्द तक्रार देण्याकरीता काल गेले होते .

त्यांच्या तक्रारी वरून विशाल काशीराम बोरकर यांच्यावर भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे, दरम्यान हिंदू देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सार्वजनिक व सामाजिक माध्यमांवर देऊन धार्मिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याने हिंदूंच्या सर्व संघटनांनी याचा जोरदार विरोध केला आहे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य अशा प्रकारे होतं असलेला धार्मिक उन्माद हा सामाजिक धार्मिक आरोग्याला घातक ठरणारा असल्याने आरोपी विरोधात त्वरित कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here