Home चिमूर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात चालले तरी काय ?

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात चालले तरी काय ?

पळसगांव नाईट सफारी प्रकरणात लक्ष देतील का? चौकशी नाही तर कारवाहीची गती मात्र शून्य दिसत आहे.

दि.१० :- ताडोबा प्रशासनाच्या वतीने पळसगांव बफर झोन मध्ये नाईट सफारी मध्ये फुकटवारी पर्यटन सफारी केल्याची खळबळजनक व धक्कादायक माहिती समोर आली असता त्या प्रकरणाची चौकशी करण्यास वनविभागा कडून टाळाटाळ आणि विलंब केल्या जात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे.

यापूर्वी बेलारा गोंडमोहाळी गेट मध्ये चुकीच्या रस्त्याने सफारी केल्याचा ठपका ठेवत गेट पंधरा दिवसासाठी पूर्णता बंद करण्यात आला होता, तर मागील २८ मार्च ला

Welcome To an enchanting forest PALASGAON Night Safari

मदनापूर गेटवर चालक व गाईड मध्ये वाद झाला असता त्याना १ महिन्यासाठी वनविभागाने आदेश देऊन निलंबित केल्या गेले आहे.

मात्र पळसगांव येथे नाईट सफारी मध्ये चक्क जिप्सी विनाबुकिंग सफारी केली यावर अजूनही साधी

ताडोबा प्रशासनाच्या वतीने पर्यटनाच्या सफारीवर पर्यटका कडून सफारीवर शुल्क पोटी लाखो रुपये गोळा केल्या जातात. मात्र ताडोबा मधील जंगलाच्या सुरक्षेसाठी आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

तेव्हा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष देऊन झालेल्या अवैध जिप्सी प्रकरणी लक्ष देऊन कारवाही करतील काय ? अशी नागरिकांची मागणी आहे.

फुकट नाईट सफारी प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद असून कारवाई का नाही असा प्रश्न केला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here