भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव बोद्धीसत्व ,विश्ववरत्न महाविद्धवान परमपूज्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त स्त्री शक्ती बहुउदेशीय संस्था चंद्रपूर वतीने जयंती साजरी करण्यात आली, यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सायली येरणें आणि इतर सदस्यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले, तसेच आंबेडकर चौक मेन रोड चंद्रपूर येथे बिस्किट वाटप करण्यात आले,
याप्रसंगी विना बोरकर, संतोषी चौहान ,अल्का मेश्राम, पूजा शेरकी,प्रेमीला बावणे,माधुरी निवलकर व प्रतिभा लोनगाडगे इत्यादी स्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.