स्थानिक ठाणेदार व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने सुरू असलेली शुभम व नाना चांभारे या रेती तस्करांची चोरी अखेर पकडली.
भद्रावती/माजरी प्रतिनिधी
माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राळेगाव रेती घाटावर अवैध रेती उत्खनन होतं असल्याच्या गुप्त सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी शेतकऱ्यांच्या परिवेशात आपल्या मोजक्या पोलीस कर्मचाऱ्याना घेऊन धाड टाकली व दोन पोकलॅन मशीन सह इतर मुद्देमाल जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.या कारवाईने अवैध रेती वाहतूक व रेती उत्खनन करणाऱ्या रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
वरोरा भद्रावती क्षेत्रात अवैध धंद्यावर आळा बसविण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी बऱ्यापैकी यश मिळवले असले तरी स्थानिक माजरी पोलीस अधिकारी व भद्रावती तहसीलदार यांच्या आशीर्वादाने माजरी जवळील पाटाळा- राळेगाव रेती घाटांवर शुभम व नाना चांभारे या रेती तस्करांचे पोकलॅन मशीन ने रेती उत्खनन सुरूच होते. जवळपास 2 कोटी रुपये किंमतीचा रेती साठा या तस्करांनी पळवला असून एकाच रेती घाटावर दोन ठिकाणी रेती साठा करण्याचे डेपो तहसीलदार यांनी या रेती तस्करांना दिल्याने त्यांच्या या अवैध रेती उत्खनन व चोरीत त्यांचा मोठा सहभाग असल्याने गुप्त सुचनेच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा साहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी राळेगाव येथील रेती घाटावर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वेशात आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना पण सिव्हील वेशात घेऊन धाड टाकली त्यात दोन पोकलॅन मशीनसह कोट्यावधी रुपयांचा रेती साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान या रेती घाटाच्या जवळ उभे असलेले दोन हायवा व एक कार सुद्धा जप्त होणार असल्याची माहिती आहे.
तहसीलदार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?
या रेती घाटांवर जे मोठमोठे खड्डे खोदल्या गेले त्याचे मोजमाप तहसीलदार यांच्या मार्फत करण्यात येणार आहे मात्र खरोखरच तहसीलदारहे खड्डे प्रामाणिकपणे मोजणार कां ? हा प्रश्न विचारल्या जातं आहे.कारण छोट्या ट्रॅक्टर्सवर कारवाई करणारे तहसीलदार हे मोठमोठे हायवा ट्रकवर मात्र कारवाई करत नव्हते आणि या रेती घाटातमोठे रेती साठे जमा आहे शिवाय रेती तस्करांना दोन रेती डेपोची मंजुरी पण तहसीलदार यांनीचदिल्याने तहसीलदार यांच्या भूमिकेवर प्रश्नाचिन्ह उभे राहत आहे.या संदर्भात आता जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.