Home चंद्रपूर ग्रामगीतेत व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मितीची शक्ती – आ. किशोर जोरगेवार

ग्रामगीतेत व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मितीची शक्ती – आ. किशोर जोरगेवार

श्री. गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञान चंद्रपूर परिवार तर्फे राष्ट्रीय ग्रामजयंती महोत्सव

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-  वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी भजन आणि किर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे काम केले. संपूर्ण देशभर फिरून त्यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. आपल्या लिखाणातून अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन आणि आत्मिक विकास ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४१ अध्यायांचे ४,६७५ ओव्या असलेले ‘ग्रामगीता’ हे काव्य रचले. त्यांनी ग्राम उन्नतीसाठी लिहिलेल्या ग्रामगीतेतील विचार आजही समाजासाठी उपयोगी असून या ग्रामगीतेत व्यसनमुक्त, सशक्त समाज निर्मितीची शक्ती असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त न्यु इंग्लीश हायस्कुलच्या प्रांगणावर तीन दिवसीय राष्ट्रीय ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, पद्र्मश्री, कृषीऋषी डॉ. सुभाष पाळेकर, चैनईचे गव्यसिद्धाचार्य डॉ.निरंजन वर्मा, अड्याल टेकडीचे संचालक सुबोध दादा आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, बहुतांश भारत देश हा खेड्यात वसलेला आहे त्यामुळे राष्ट्राचा विकास करावयाचा असेल तर ग्रामीण भाग सुधारला पाहिजे, हा भाग जुन्या रुढी परंपरेपासून मुक्त झाला पाहिजे अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची धारणा होती. खेड्यातील जीवन मानवी मुल्यांनी संस्कारित झाल्यास ते स्वयंपूर्ण होऊ शकेल आणि खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकेल, ही समजच त्यांच्या कार्याची केंद्रबिंदू होती.
ग्रामीण भागाचा विकास हा आमचाही प्रमुख उद्दिष्ट राहिला आहे. यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. येथे मुलभुत सोयी सूविधांसह समाज भवन, पांदण रस्ते आणि विशेषतः अभ्यासिकांचे काम सुरु आहे. लवकरच हे सर्व कामे पुर्ण होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. आपण केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३९ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यातून ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडणा-र्या मार्गाचे काम केल्या जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. श्री. गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञान चंद्रपूर परिवार तर्फे आयोजित ग्रामजयंती महोत्सवाचा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने समाज प्रबोधनाचे काम केल्या जात आहे. असे आयोजन नियमीत करावे लोकप्रतिनीधी तथा गुरुदेव सेवक म्हणून मी सैदव आपल्या सोबत राहिल असेही ते यावेळी म्हणाले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबनराव अनमुलवार, शंकरराव दरेकर, मुरलीधर गोहने., पुरुषोत्तम सहारे, पुंडलिकराव रोडे, भाऊरावजी बावणे, पुरुषोत्तम राऊत, अरुण भाऊ चांदेकर, रामरावजी धारणे, ज्ञानेश्वर केसाळे महाराज, आनंदराव मांदळे, भास्करराव इसनकर, केशवराव गराटे, घनश्याम मातेरे, विजय देरकर, नामदेव अस्वले, यांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here