Home धार्मिक आमदार किशोर जोरगेवार यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

आमदार किशोर जोरगेवार यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- रमजान ईद निमित्त आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी लष्कर ईदगाह आणि शाही गुप्त मस्जिद येथे जाऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार, वाहतूक पोलीस निरीक्षक रोशन यादव, अनवर खान, अनवर अली, जहिर काजी, अजहर काजी, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, युथ अध्यक्ष राशेद हुसेन, इमरान शेख, सय्यद अबरार, व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आज संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येथे चंद्रपूरमध्ये सुद्धा ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील लष्कर ईदगाह आणि शाही गुप्त मस्जिद येथे उपस्थिती दर्शवत दहगाहमध्ये येणा-या मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचे रॉकेट सक्रिय? लाखों मद्य शौकीनांच्या जीवाशी खेळ.
Next articleवादळामुळे पती-पत्नीच्या डोक्यावर टिन पडून मृत्यू मुले झाले पोरकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here