Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचे रॉकेट सक्रिय? लाखों मद्य शौकीनांच्या जीवाशी...

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचे रॉकेट सक्रिय? लाखों मद्य शौकीनांच्या जीवाशी खेळ.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई ने उडाली खळबळ, जिल्ह्यात इतरही ठिकाणी बनावट दारू निर्मितीचे अड्डे असण्याची शक्यता.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतांना ज्या पद्धतीची बनावट दारू विकल्या जायची तीच बनावट दारू आता जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यावरही सुरू असल्याची खळबळजनक घटना समोर आली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट दारू विक्री सुरूच असल्याची भीती व्यक्त केल्या जातं आहे.

मागील काही काळापासून जिल्ह्यात बनावट दारू निर्मिती सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत असल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या बनावट दारूमुळे मद्य शौकिनांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही पर्यायाने यांची जबाबदारी नेमकी कोण घेइल हा प्रश्न उभा ठाकला आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील मुल तालुक्यात दोन वेगवेगळया ठिकाणी धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या अवैध दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला होता. ह्या घटनेची शाई वाळते ना वाळते तर चक्क जिल्हा मुख्यालयीच असलेल्या चंद्रपूर शहरातील जलनगरच्या कंजर मोहल्यात स्थानिक गुन्हे शाखेने धाड घालून भेसळयुक्त विदेशी मद्यसाठा तसेच भेसळ करण्याकरिता वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here