Home चंद्रपूर क्राईम :- कत्तलखान्यात जाणाऱ्या आयचर वाहनातील जनावरांची सुटका.

क्राईम :- कत्तलखान्यात जाणाऱ्या आयचर वाहनातील जनावरांची सुटका.

पडोली पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक तर तिसरा फरार.

पडोली प्रतिनिधी  :-

चंद्रपूर जिल्ह्यातून आंध्र प्रदेश तेलंगणातील कत्तलखान्यात जनावरे नेण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सुटका पडोली पोलिसांनी करून दोघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. काल गुरुवारी मध्यरात्री साखरवाही टोल नाक्यावर नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी पकडलेल्या वाहनांची झाडाझडती घेतली असता तिथे १९ जनावरे कोंबले होते आणि आरोपी अब्दुल अजीज अब्दुल रऊफ (२७), जुबेर अहमद गुलाब रसूल कुरेशी (४०) दोघेही रा. गडचांदूर यांना अटक केली आहे तर मुजममील खॉ वाहाब खॉ (२४) रा. गडचांदूर हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच साखरवाही टोल नाका येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयचर क्र. एमएच 27, बी एक्स 5838 येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले. पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला. पोलिसांनी जनावरांसह दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात देवाजी निखाडे, विनोद वनकर, किशोर वाकाटे, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पकंज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here