Home चंद्रपूर मनपाच्या २७ शाळांचा बदलणार चेहरामोहरा

मनपाच्या २७ शाळांचा बदलणार चेहरामोहरा

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

आयुक्तांचे निर्देश : नव्या सत्रात भौतिक सुविधा वाढविण्यावर भर

चंद्रपूर :-  महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावत असून विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या पाहता सर्व मनपा शाळांना उत्तम भौतिक सुविधा देण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

मंगळवार १८ एप्रिल रोजी झालेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी मनपा शाळेतील सोयी- सुविधांचा आढावा घेतला. शहरात मनपाच्या २७ शाळा आहेत. यातील पंडित नेहरू प्राथमिक शाळा, इंदिरा नगर, भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर शाळा, आंबेडकर नगर, रयतवारी कॉलरी मराठी शाळा, बंगाली कॅम्प, लोकमान्य टिळक कन्या

शाळा, पठाणपूरा रोड या चार शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या. त्या पाडून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले उच्च व माध्यमिक विद्यालय, बाबूपेठ, शहीद भगतसिंग शाळा, भिवापूर, महात्मा फुले शाळा घुटकाळा या शाळांमध्ये वर्ग

खोली बांधकाम करून अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत.

ज्या शाळेत मैदान उपलब्ध आहे ते क्रीडांगण म्हणून विकसित करणे, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ व निरोगी असावेत या दृष्टीने खेळण्याचे

साहित्य घेणे, साहित्य ठेवण्याच्या खोलीचे निर्माण करण्यात येणार आहे. तसेच शाळेला लागून मोकळी जागा असल्यास ती सुद्धा विकसित करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत आधुनिक शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प, भिंतींचे आदी उपस्थित होते.

कुंपण, प्रत्येक वर्गात ई-लर्निंगसाठी अत्याधुनिक संगणक व प्रोजेक्टर्स, आधुनिक पद्धतीचे डेस्क बेंच, टाईल्स, दरवाजे, खिडक्या, रंगरंगोटी, फॅन, इलेक्ट्रिक सप्लाय, लहान मुलांसाठी आकर्षक खेळण्याचे साहित्य, ग्रीन मॅट, सीसीटीव्ही, डिजिटल लॅब, लायब्ररी, वॉटर कूलर्स, चित्र सजावट यासाठी येत्या १५ दिवसांत प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी नागेश नित यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षणाचा दर्जा, शाळेची परिस्थिती, दृष्टिकोन यात आमूलाग्र बदल केला आहे. मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेला इयत्ता १० वी पर्यंत मान्यता मिळाली असून या शाळेतील डिजिटल वर्गाचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केले होते. बैठकीला उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, उपअभियंता अनिल घुमडे, रवींद्र हजारे, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here