Home क्राईम स्टोरी साहेबांची कृपादृष्टी, लाच घेताना सापडले, मग निलंबन का लटकावले ?

साहेबांची कृपादृष्टी, लाच घेताना सापडले, मग निलंबन का लटकावले ?

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  काम करून देण्यासाठी पैसे मागण्याचा प्रकार आता सर्रास सुरू आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयात तर हा प्रकार अधिकच वाढत आहे. लाच स्वीकारणे हा गुन्हा असतानाही सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मागील वर्षभराचा विचार केल्यास महसूल विभागामध्ये सर्वाधिक लाचखोर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाईतून दिसून येते. दरम्यान, यातील काहींनी पळवाटा काढून पुन्हा रुजू होण्यासाठी प्रयत्न केला आहे.

अनेक वेळा लाच प्रकरणात अडकल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचे वरिष्ठ निलंबनासह इतर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही वेळा केवळ टेबल बदलवून देत, पुन्हा त्या कर्मचाऱ्याला सेवेमध्ये रुजू करून घेण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे लाच मागणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणातील धोरण अधिक कडक करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात महसूलसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी लाच घेतली आहे.

२०२२ मध्ये कोणत्या विभागाचे किती लाचखोर पकडले?

विभाग।          पकडलेले कर्मचारी

महसूल.             ४

पोलिस.             १

जिल्हा परिषद.    १

महावितरण.        १

महापालिका.       १

कुषी.              १

भूमिअभिलेख.       १

वनविभाग.            १

शिक्षण.               १

अन्य.                  ३

सर्वाधिक लाचखोर

महसूलमध्ये

लाच घेताना १५ जणांना पकडले

मागील वर्षभरात फेब्रुवारी महिन्यापर्यंत १५ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या आरोपींचे निलंबन करण्यात आले आहे, तर काहीचे प्रस्ताव दाखल झाले आहे.

निलंबित कधी करता येते?

शासनाच्या नियमानुसार २४ तासांपेक्षा अधिक वेळ जर अधिकारी, कर्मचारी पोलिस कोठडीत असेल, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते.

निलंबनाची प्रक्रिया काय?

■ लाच प्रकरणी कारवाई झाल्यानंतर याबाबतचा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाचे प्रमुख त्या व्यक्तीला निलंबित करायचे का, याबाबत निर्णय घेता

लाच घेणे, देणे गुन्हा

लाचखोरांना केले निलंबित

जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत १५ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यातील काहीचे निलंबन झाले आहे, तर का जण निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

लाच मागणे व लाच देणे दोन्ही गुन्हा आहे. परंतु अनेक जण काम करून देण्यासाठी लाच मागतात. मात्र, हा गुन्हा ठरतो. कुणी लाच मागत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक

विभागाकडे किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते.

■ मागील वर्षभरामध्ये १५ लाचखोरांमध्ये सर्वाधिक कर्मचारी महसूल विभागाचे आहे. वर्षभरामध्ये चार कर्मचायांनी लाच

घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागा- कडून माहिती मिळाली आहे. दरम्यान, अन विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here