Home चंद्रपूर उपजिल्हा रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन सुरू होणार

उपजिल्हा रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन सुरू होणार

हिंगणघाट येथील प्रायश्चित आंदोलन मागे

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

हिंगणघाट (वा.) येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑगस्ट 2020 पासून बंद असलेली सोनोग्राफी मशीन पूर्ववत येत्या 26 एप्रिल पासून सुरू करून लेप्रोस्कोपी कुटूंब नियोजनाचे शिबिर नियमित सुरु करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सोमवार 24 एप्रिलला दुपारी एक वाजता गजू कुबडे यांचे प्रायश्चित आंदोलन मागे घेण्यात आले.

आरोग्यविषयक कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने

येथील उपजिल्हा सामान्य नागरिकांची मोठी कुचंबना होत होती. याविरोधात सोमवार 24 एप्रिलला रुग्णमित्र गजू कुबडे यांनी एक दिवसाचे उन्हात अणवाणी पायांनी उपविभागीय कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तातडीने दखल उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी घेतली उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अव्यवस्थेच्या विरोधात

फलक हातात झळकवीत त्यांनी शेकडो नागरिक व प्रहार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर तहसीलदार सतीश मिसाळ, अन्न व पुरवठा अधिकारी सुहास टोंग यांनी आंदोलनस्थळी येऊन गजू कुबडे यांच्याशी चर्चा केली. मागणी मान्य असून आंदोलन मागे घेण्याची विंनती केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. चाचरकर यांनी स्वतः आंदोलन स्थळी येत लेखी पत्र गजू कुबडे यांच्या सुपूर्द केले. आंदोलनात प्रहार कार्यकर्ते रुग्णालयात अतुल जाधव, अजय लढी, वन्यजीव रक्षक राकेश झाडे, सूरज कुबडे, राजू बोभाटे, अजय खेडेकर, राहुल पाटील, धीरज नन्दरे, शेखर जामुनकर, सुधीर मोरेवार, अमजद पठाण, सागर आत्राम, रितेश गुडधे, मोहन पेरकुंडे, राजेश पंपनवार, रोशन बरबटकर, मुन्ना ठाकूर, मयूर पुसदेकर, अजय खेडेकर, राहुल पाटील, धीरज नंदरे, सागर आत्राम, रुपेश गुडदे, प्रकाश म्हणणे, दीपक पावडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here