Home चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर्फे १ मे महाराष्ट्र दिना निमित्त भव्य मिरवणूक 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तर्फे १ मे महाराष्ट्र दिना निमित्त भव्य मिरवणूक 


 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे भव्य मिरवणूक सोमवार, दिनांक ०१ मे २०२३  वेळ : सायंकाळी ५.०० वाजता. स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर

का म्हणवतात ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दरवर्षी १ मे ला हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून सुद्धा ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत- रचना करण्यात आली. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. याचा विरोध म्हणून महाराष्ट्रातील जनतेने सरकारला विरोध केला आणि आंदोलने केली. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते परंतु हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व जनतेच्या आंदोलनामुळ
१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.

या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शाळा, . महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिंना पुरस्कृत केले जाते.म्हणून मोठया उत्साहात प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो.

तमाम महाराष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींनी तथा जेष्ठ  नागरिकांनी भव्य मिरवणूकीत उपस्थित रहावे हि विनंती. मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गिरनार चौक-गांधी चौक- जटपुरा गेट ते कस्तुरबा सांगता – छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर मार्ग-

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माझी. नगरसेवक, तथा शहर अध्यक्ष सचिन भोयर, प्रतिमा ठाकुर जिल्हाध्यक्ष, भरत गुप्ता अध्यक्ष, प्रा. नितीन भोयर जिल्हाध्यक्ष, माया मेश्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here