Home चंद्रपूर चंद्रपूर पोलीस दलात शोककळा पसरली

चंद्रपूर पोलीस दलात शोककळा पसरली

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी जयंत अशोक बल्लावार हे काही कामासाठी प्रशासकीय भवन जवळून जात असतांना जयंत अचानक रोडवर बेशुद्ध होवून खाली पडले असता काही नागरिकांनी त्यांना उचलून तात्काळ, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र उपचार सुरु असताना सकाळी 8 वाजता जयंत चा मृत्यू झाला. जयंत बल्लावार हा चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयातील फुटबॉल ग्राउंड मध्ये कार्यरत होता, सकाळी तो कामानिमित्त बाहेर निघाला होता. त्यावेळेस तो कर्तव्यावर  असताना दुर्दैवी मृत्यू झाला. 25 एप्रिलला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास सकाळी प्रशासकीय इमारती जवळून जात असताना जयंत ला अचानक भोवळ आली आणि तो रस्त्याच्या कडेला कोसळला. असे येथील नागरिकांचे मनःने होते Chandrapur police

जयंत च्या निधनाने चंद्रपूर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Previous articleखारघर मृत्यूप्रकरणी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे
Next articleकोंबड बाजारावर धाड; सहा जणांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here