Home चंद्रपूर चांदा पब्लिक स्कूल गरिबांची शाळा आहे का, मनसेचा सवाल?

चांदा पब्लिक स्कूल गरिबांची शाळा आहे का, मनसेचा सवाल?

वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या वतीने तीस काम्पुटर व दोन प्रिंटर शाळेला भेट दिल्याने उठला वाद.

चंद्रपूर :-

जिल्ह्यात जे काही उद्दोग आहेत त्या उद्दोगाच्या माध्यमातून सीएसआर फंड वापरून एखाद्याचं भलं झालं असेल लोककल्याणासाठी वापरला गेला असेल असा एखादा दुर्मिळ प्रसंग सुद्धा बघावयास मिळत नसताना अगोदरच श्रीमंत असलेल्या चांदा पब्लिक स्कूल ला चंद्रपूर क्षेत्राकडून तीस काम्पुटर व दोन प्रिंटर सीएसआर फंडातून दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे दरम्यान चांदा पब्लिक स्कूल गरिबांची शाळा आहे का ? असा सवाल करून या प्रकरणाची चौकशी करून सीएसआर फंड चा योग्य विनियोग करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा वेकोलि चंद्रपूर चे मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून मनसे विधी कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्षा मंजू लेडांगे यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव किशोर मडगुलंवार, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कालबान्धे. शहर अध्यक्ष विजय तुर्क्याल, जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी, महेश वासलवार

व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 135 अधिनियम अंतर्गत ज्या कंपनीचे वार्षिक 500 कोटी पेक्षा जास्तं आहे त्यांना सीएसआर फंड सामाजिक जबाबदारी म्हणून शिक्षण, गरिबी, भूख व बेकारी यासाठी वापरला जाण्याची तरतूद एप्रिल 2014 च्या नव्या धोरणात केलेली आहे पण लोककल्याणकारी योजनेत या सीएसआर फंडाचा वापर करण्यापेक्षा तो एखाद्या जवळच्या श्रीमंत असलेल्या संस्थाना हा फंड दिल्या गेला आणि तो सुद्धा चंद्रपूर शहारातील नावाजलेल्या चांदा पब्लिक स्कूल ला त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी कक्ष विभाग जिल्हाध्यक्षा मंजू लेडांगे यांनी हा प्रश्न लावून धरला असून सीएसआर फंड च्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे यांच्या कडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here