पाथरी तालुका निर्माण संघर्ष समितीचा उपक्रम
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- सावली- पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती, अक्षयज्योत फौडेशन, अक्षयज्योत आय केअर चंद्रपूर, तथा आरोग्य वर्धिनी केंद्र पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथे रोगनिदान व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले, या शिबिरात | अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी केली, पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती चे अध्यक्ष श्री प्रफुल तुम्मे व त्यांची टीम पाथरी नगरीत लोकसेवेचा व्रत हाथी घेतला असून गेल्या अनेक वर्षा पासून समाजसेवा करीत आहेत, कोरोना काळात या टीम ने पाथरी येथे कोविड सेंटर ची निर्मिती करून अनेक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. या परिसरामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगार अश्या समस्या भेडसावत असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायत निवडनुक लढवली आणि ग्रामपंचायतीत सत्ता बसवली, पाथरी तालुका निर्माण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल तुम्मे यांनी ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी विराजमान झाले आणि या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार वव्यस्थेकडे लक्ष देऊन उत्तम व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प हाती घेतला असता सर्व व्यवस्था सुरळीत होऊ लागल्या, या नगरी मध्ये विकासकामाचा झंजावात सुरु असून विकासकामाच्या माध्यमातून आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या
माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिक्षण व्यवस्था सुद्धा सुरळीत होऊ लागली आहे, याच लोकसेवेचा वसा हाती घेऊन पाथरी नगरीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, या शिबिरात नेत्र तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग तपासणी, बालरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, मधुमेह, व उच्च रक्तदाब तपासणी व जनरल तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले, व औषधं देण्यात आले. या शिबिराला तज्ञ डॉक्टर आशिष बारबधे, डॉक्टर सुरज साळुंखे, डॉक्टर अडवानी मॅडम, डॉक्टर वैदेही लोखंडे, डॉक्टर अक्षयकुमार चव्हाण, डॉक्टर समृद्धी वासनिक, डॉक्टर हिमांशू गंधेवार तथा पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे भालेराव, तथा कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले, या शिबिराचे आयोजन प्रफुल तुम्मे उपसरपंच तथा अध्यक्ष पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती, राकेश चेन्नूरवार, मेघराज वालदे, उमाजी भाऊ भैसारे, मनोज वाघधरे, मोहित मेश्राम, सतीश उंदीरवाडे, अमित ठीकरे, अनुप वालदे दिपक दाजगाये, भोजराज मुत्तलवार, नरेश सातपैसे तथा मित्र परिवार यांनी केले, शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.