Home वरोरा खळबळजनक :- खांबाडा येथील आकाश बार लायसन्सच्या मंजुरीचे दस्तावेज कार्यालयातून गायब ?

खळबळजनक :- खांबाडा येथील आकाश बार लायसन्सच्या मंजुरीचे दस्तावेज कार्यालयातून गायब ?

दारू तस्कर अंजू सबय्या जंगोनी यांच्या आकाश बारला ग्रामपंचायतची एनओसीचं नाही.

वरोरा प्रतिनिधी :-

खांबाडा येथील अंजनेयेलु सबय्या जंगोनी उर्फ अंजु अन्ना हया अवैध दारू विक्रेत्याच्या हॉटेल आकाश बार ला ग्रामपंचायत ची एनओसी नसल्याची बाब पुढे येत असून त्यांच्या बार मंजुरीचे दस्तावेजचं राज्य उत्पादन शुल्क विभागातून गायब असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अवैध दारू विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या अंजू सबय्या जंगोनी उर्फ अंजू अन्ना यांच्या वरोरा तालुक्यातील खांबाडा या गावांत जो हॉटेल आकाश बार आहे त्या बार समोर अगोदर तर बार असल्याचा फलकच लावला नव्हता, शिवाय हॉटेल आकाशला फक्त ईटिंग लायसन्स आहे त्यातही त्या ईटिंग लायसन्सला स्थानिक नागरिकांचा सन 2010 मधेच आक्षेप होता, मात्र पैशाच्या बळावर व गुंडगिरी दाखवून परप्रांतीय अंजू अन्ना यांनी ईटिंग लायसन्सच्या नावाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थपूर्ण संबंधाने बार लायसन्स मिळवल्याचे आता समोर येत आहे..

परप्रांतीय अंजनेयेलु साबय्या जंगोनी ऊर्फ अंजू अन्ना हा अवैध दारू विक्रीच्या धंद्यात अनेक वर्षांपासून असून त्यांनी खांबाडा येथील स्थानिक काही लोकांच्या आधाराने तिथे सर्व्हे क्रमांक 170 मधील रहिवाशी क्षेत्रात जागा घेऊन तिथे हॉटेल आकाश खानावळ आणि रेस्टारंट सुरू करण्याबाबत दिनांक 28/6/2010 ला अर्ज दाखल करून ग्रामपंचायत ची एनओसी घेतली होती, दरम्यान यांचं भागातील तब्बल 14 नागरिकांनी इथे हॉटेल खानावळ नको म्हणून दिनांक 29/6/2010 ला तहसीलदार यांच्याकडे रितसर आक्षेप अर्ज दाखल केला होता. परंतु आक्षेप अर्ज तहसीलदार यांच्याकडे प्रस्तावित असतांना अंजू अन्ना यांनी 30/6/2010 ला ईटिंग लायसन्स करिता तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. दरम्यान एका ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करून अंजू अन्ना यांना हॉटेल आकाश ला ईटिंग लायसन्स देऊ नये अशी मागणी केली होती, परंतु अंजू अन्ना यांनी त्या सदस्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला त्याचा आक्षेप अर्ज व तक्रार मागे घ्यायला लावली होती व त्यानंतर त्याला ईटिंग लायसन्स मिळाले मात्र तेथील रहिवासी यांनी दिलेल्या तक्रारीची दखल तत्कालीन प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे ईटिंग लायसन्स च्या नावाखाली बेकायदेशीर बार ची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिल्याने व हया बार चे मंजुरी चे दस्तावेजचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नस्ती मधून गायब झाल्याने याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आकाश बार चे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर बार च्या मंजुरी संदर्भात दस्तावेज एका पत्रकाराकडे असून त्यात दस्तावेजाच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्या निकषांच्या भरोशावर अंजू अन्ना यांना लायसन्स दिले ? याचा उलगडा होतं असून ज्याअर्थी बार च्या परवानगी करिता एनओसी चं दिली नाही तर बार ची मंजुरी कशी ? हा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान दिनांक ०४/२/२०१२ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय अबकारी अनुज्ञाती मंजूरी समितीच्या निर्णयान्वये हॉटेल आकाश बार ला मंजुरी देण्यात आली त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं असल्याने नियमानुसार बार चे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी होतं आहे.

Previous articleअखेर सोनोग्राफीची मशीन झाली सुरू,गजुभाऊ कुबडे यांच्या आंदोलनाची  पूर्णाहुती
Next articleपाथरी नगरीत रोगनिदान व मार्गदर्शन शिबीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here