Home चंद्रपूर महाराष्ट्र दिनी मनसेचा अभिनव उपक्रम, घंटागाडी महिला कामगारांना साडीचोळीची भेट.

महाराष्ट्र दिनी मनसेचा अभिनव उपक्रम, घंटागाडी महिला कामगारांना साडीचोळीची भेट.

जिल्ह्याच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग, मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

चंद्रपूर :-

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेत कार्यरत घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणाऱ्या महिला भगिनींना  दिनांक 1 मे ला स्थानिक विश्रामगृह सभागृहात साडीचोळी देऊन अनोख्या पद्धतीने त्यांचा सत्कार व गौरव केला. चंद्रपूर शहाराला स्वच्छ सुंदर व इतर शहराच्या तुलनेत स्वच्छता अभियानात पुढे घेऊन जाण्यासाठी शहरातील घंटागाडी घेऊन वार्डावार्डात कचरा संकलन करणाऱ्या महिला कामगार यांच्याकडे खऱ्या अर्थानं शहराची मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी सांभाळून सकाळी उठल्यापासून त्या घरातील परिवाराला वेळ न देता सतत आपल्या कार्यांत असतात, मात्र त्यांच्या या कामाचे कौतुक कुणी करत नाही त्यामुळे निरंतर कार्यरत या महिला भगिनींना उसंत मिळून त्यांच्या कार्याचा गौरव करावा व त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यावे या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनी व कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांना साडीचोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला, मनसेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविश सींग, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड. मनसे विधी कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्षा मंजू लेडांगे, माजी नगरसेविका सीमा रामेडवार, जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जिल्हा सचिव किशोर माडगुलवार, जनहित कक्ष जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी,, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, विवेक धोटे, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,क्रिष्णा गुप्ता प्रविन शेवते, करन नायर, राज वर्मा, पीयूष धूपे, निलेश जुमडे, वर्षा भोम्बले व इतर मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here