Home वरोरा शिंदे-फडणवीस  साहेब कधी देणार पीक विम्याची रक्कम?

शिंदे-फडणवीस  साहेब कधी देणार पीक विम्याची रक्कम?

अतिवृष्टी,अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम मिळवून देण्याची मागणी

मनोहर खिरटकर :-

वरोरा तालुक्यातील शेतकरी अद्याप अतिवृष्टि, अस्मानी सुलतानी संकटातुन सावरलेला नसताना पीक विमा कंपनीच्या वतीने शेतकरी बांधवाना मोठा आर्थिक फटका दिला गेला आहे , दरम्यान विम्याच्या नावाखाली पीक विमा कंपन्यांनी शेतकर्याकडून करोडो रूपयाची माया जमवून शेतकर्याच्या तोंडाला पाने पुसल्याचा धक्कादायक प्रकार केला असल्याचे समोर येत आहे

विशेषता सध्या राज्यभर पीक विम्याचा विषय गाजत असताना लोकप्रतिनिधी मात्र काहीच बोलायला तयार नाहीत, खरं तर खुप मोठा गाजावाजा करून शेतकर्याना कृषी विभाग व मोदी सरकारने पीकांचा विमा उतरविण्याचे आवाहन केले होते त्यामुळे शेतकर्यानी उसनवारी व हाऊसने कर्ज घेऊन करून पीक विम्याची रक्कम भरली होती, मात्र आता पीक विमा देण्याची वेळ आली तर प्रत्येकजण आपआपली जबाबदारी ढकलताना दिसुन येत आहे, त्यामुळेच राज्य सरकारवर शेतकरी राजा संतापला असून पीकविमा फक्त विमा कंपण्याना नफा कमवण्यासाठी सरकारने सूट दिली आहे का ? असा सवाल करून शिंदे फडणवीस सरकारने विमा कंपन्यांवर तात्काळ शक्तीचा आदेश करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळवून द्यावे. अशी मागणी होत आहे. दरम्यान संबंधित जबाबदार यंत्रणेकडून या विषयात विशेष लक्ष घालून शेतकर्याना त्यांच्या हक्काचा विमा मिळवून देण्यासाठी स्वतः यंत्रणेला कामाला लावावे असे आवाहन शेतकऱ्यांकडून सरकारकडे करण्यात येत आहे. काही पीकविमा धारक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या तुंटपुज्या रक्कमा देण्यात आल्या तर कित्येक शेतकर्याना आजतागायत रुपया सुद्धा देण्यात आला नाही पर्यायाने अतिवृष्टि व पुरामुळे वरोरा तालुक्यातील पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यात खांबाडा, टेमुर्डा, शेगांव व माढेळी विभागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.

या संदर्भात संबंधित तलाठ्यानी पंचनामे सुद्धा केले तरी नुकसान भरपाई दिली नाही, या शेतकऱ्यांच्या ज्वलंत व गंभीर प्रश्नांबाबत येथील लोकप्रतिनिधी मात्र जणू काही दुर्लक्ष करत असून त्यांना फक्त निवडणुका कशा जिंकायच्या यांचे सूत्र समजते पण शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतांना त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधीकडे वेळ नसेल तर मग जनतेने मतदान यांना द्यायचे कुठल्या निकषांवर व मुद्द्यावर द्यायचे असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

काही शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात 5 हजार जमा ?

वरोरा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पाच हजाराप्रमाणे पीकविमा जमा झाला असला तरी ती रक्कम अत्यल्प आहे तरी येथील स्थानीक लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर विषयात लक्ष घालून आमच्या हक्काचा पीकविमा मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे

Previous articleमहाराष्ट्र दिनी मनसेचा अभिनव उपक्रम, घंटागाडी महिला कामगारांना साडीचोळीची भेट.
Next articleअभिनंदनीय :- जेष्ठ पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर यांची झेडआरयूसीसी-सेंट्रल रेल्वे सदस्य पदी नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here