Home चंद्रपूर वरातीची बस खड्डयात कोसळली, एक महिला जागीच ठार तर वीस जण जखमी

वरातीची बस खड्डयात कोसळली, एक महिला जागीच ठार तर वीस जण जखमी

सुनंदा हरिदास मडावी या महिलेचा जागीच मृत्यू

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-मुल तालुक्यातील नांदगाव येथील अनिल विलास मडावी या तरुणाचा विवाह सोहळा आटोपून वरात परत येत असताना वरातीची ट्रॅव्हल्स खड्ड्यात कोसळली. या अपघातात सुनंदा हरिदास मडावी वय अंदाजे पन्नास वर्ष ही महिला जागीच ठार झाली असून वीस जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार नांदगाव येथील विलास मडावी यांच्या मुलाचा विवाह बल्लारपूर येथे काल दिनांक 12 मे रोजी संपन्न झाला. विवाह सोहळा आटोपून नांदगाव ला परत येत असताना ( मानोरा) किन्ही कोर्टी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स होल खड्ड्यात कोसळली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव येथील माजी सरपंच मंगेश मगनुरवार व निलेश मगनूरवार या बंधूंनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. जखमींना मुल, बल्लारपूर, चंद्रपूर येथील रुग्णालयात

उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून पुढील

तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here