Home चंद्रपूर

सुनंदा हरिदास मडावी या महिलेचा जागीच मृत्यू

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-मुल तालुक्यातील नांदगाव येथील अनिल विलास मडावी या तरुणाचा विवाह सोहळा आटोपून वरात परत येत असताना वरातीची ट्रॅव्हल्स खड्ड्यात कोसळली. या अपघातात सुनंदा हरिदास मडावी वय अंदाजे पन्नास वर्ष ही महिला जागीच ठार झाली असून वीस जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार नांदगाव येथील विलास मडावी यांच्या मुलाचा विवाह बल्लारपूर येथे काल दिनांक 12 मे रोजी संपन्न झाला. विवाह सोहळा आटोपून नांदगाव ला परत येत असताना ( मानोरा) किन्ही कोर्टी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स होल खड्ड्यात कोसळली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव येथील माजी सरपंच मंगेश मगनुरवार व निलेश मगनूरवार या बंधूंनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. जखमींना मुल, बल्लारपूर, चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleमुल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती पदाची निवडणूक अविरोध
Next articleवरातीची बस खड्डयात कोसळली, एक महिला जागीच ठार तर वीस जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here