Home चंद्रपूर मुल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती पदाची निवडणूक अविरोध

मुल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती पदाची निवडणूक अविरोध

मुल बाजार समितीच्या सभापती राकेश रत्नावार: उपसभापतीपदी राजेंद्र कन्नमवार

राजेंद्र मेश्राम

चंद्रपूर जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:- मूल बाजार समितीचे सभापतीपदी राकेश रत्नावार तर राजेंद्र कन्नमवार यांची उपसभापती म्हणुन अविरोध निवड करण्यात आली आहे.18 संचालक असलेल्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक 28 एप्रिल रोजी पार पडली. यानिवडणुकीत संतोष रावत गटाचे 17 संचालक निवडुण आले. आज (शुक्रवार) सभापती, उपसभापती निवडणुक बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार यांची | सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली आहे तर उपसभापतीपदी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राजेंद्र कन्नमवार यांची अविरोध निवड करण्यात आली. यांना निवडणूक प्रक्रियेत निवडणुक प्राधिकृत अधिकारी म्हणुन तुपट यांनी काम मूल (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाहिले.

Previous articleसंतापजनक :- सीडीसीसी बँकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार.
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here