Home क्राईम स्टोरी संतापजनक :- सीडीसीसी बँकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार.

संतापजनक :- सीडीसीसी बँकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार.

जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटल्याचे संकेत.गुंडगिरी व त्यातून होणारे हल्ले संतापजनक

(मूल) चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर काल सायंकाळी त्यांच्या मूल शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या परिसरात अज्ञात इसमानी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली असून गोळीबार झाल्याच्या ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज मिळाले असल्याने ते आरोपी नेमके कोण आहे याविषयी पोलीस तपास करीत आहे. दरम्यान या गोळीबारात संतोष रावत यांना त्यांचा हाताला घासून गोळी गेली असल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काही राजकीय नेते व त्यांचे पाठीराखे यांचे अवैध व्यवसाय असून त्यांच्या माध्यमातून गुंडगिरी मोठ्या प्रमाणांत पसरली आहे. दरम्यान यांचं अवैध व्यवसाय व काही राजकीय सेटलमेंट करिता जीवघेणी स्पर्धा आता हल्ल्याचे कारण बनत असल्याचे समोर येत आहे. यावर पोलीस प्रशासन अंकुश लावू शकत नाही कारण त्यांच्या कार्यकक्षेत हे मुद्दे येत नाही पण ज्या अवैध व्यवसायीकांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहे त्यांवर प्रहार करूनकाही अंशी यावर मात होऊ शकते. या प्रकरणी मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष रावत यांना मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करिता नेण्याचा आले होते.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे मुल येथील शाखेत आपल्या कार्यकर्त्यासह बसून होते, दरम्यान रात्रौ 9:30 वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता, एका स्विफ्ट कार मधुन बुरखाधारी इसमाने त्यांचावर गोळीभार केला, यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कार पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कार घेऊन पळुन जाण्यास ते यशस्वी झाले. रावत यांचावर गोळीबार करण्यामागचे कारण मात्र अजूनही गुलदस्तात आहे.

सदर घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारा अज्ञात इसम फरार आहे. अनेकांनी या घटनेचे निषेध केला आहे. मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Previous articleशक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाजाची गरज – आ. किशोर जोरगेवार
Next articleमुल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती पदाची निवडणूक अविरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here