Home चंद्रपूर मनसेच्या सी.एस.आर फंड घोटाळ्यातील आंदोलनाने वेकोलिचे वेधले लक्ष.

मनसेच्या सी.एस.आर फंड घोटाळ्यातील आंदोलनाने वेकोलिचे वेधले लक्ष.

चांदा पब्लिक स्कूल ला दिलेल्या सी.एस.आर निधी बद्दल खुलासा न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू मनसेचा इशारा.

वेकोली विरुद्ध पी.आय.एल न्यायालयात दाखल करू-मनसे विधी विभागाच्या मंजू लेडांगे यांचा गर्भित इशारा.

चंद्रपूर :-

वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड चा आर्थिक वर्षातील सी. एस. आर निधी चा गैरवापर करून ३० संगणक व दोन प्रिंटर हे चांदा पब्लिक स्कूल शाळेला दिले आहे, मात्र ही एक खाजगी शाळा असून विद्यार्थीना शाळेत प्रवेश घेतानाच पालकांकडून डोनेशन घेऊन अवाजवी शुल्क आकारून फी घेतली जाते असे असताना देखील वेकोलि प्रशासनाने सी.एस.आर फंड चांदा पब्लिक स्कूल ला दिला जो चुकीचा व नियमबाह्य असल्याने वेकोलिच्या या निर्णयाविरोधात मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन चंद्रपूर वेकोलि मुख्य महाप्रबंधक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३५ च्या कोणत्या नियमानुसार सी. एस. आर फंड हा चांदा पब्लिक स्कूल ला दिला व त्यातून कोणती सामाजीक सेवा झाली याचा खुलासा करावा असा सवाल करून मनसेच्या विधी कक्ष विभाग जिल्हाध्यक्षा अँड मंजू लेडांगे यांच्या नेत्रुत्वात वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर धरने आंदोलन करून वेकोलि चा सीएसआर घोटाळा समोर आणला. सीएसआर फंड या शाळेला दिल्या मूळे गोर गरीब विद्यार्थीन वरती अन्याय झालेला आहे आपण हा निधी चांदा पब्लिक स्कूल ला देवून निधी चा गैरवापर केला आहे. सी. एस. आर निधी बेकायदेशीरित्या वापरला याला महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा जाहीर विरोध ‘आहे. सदर निधी कोणत्या शीर्षका/नियमाखाली देण्यात आला याचा खुलासा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू व न्यायालयात वेकोली विरुद्ध पी.आय.एल दाखल करू असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला.

यावेळी मनसे विधी जिल्हाध्यक्षा एडवोकेट मंजु लेडांगे , मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव उमाशंकर तिवारी, महेश शास्त्रकार, सुनील गुडे, राजू कुकडे शहर अध्यक्ष विजय तुरक्याल, किशोर माडगुलवार, आनंद बावणे ,महेश वासलवार रमेश काळबांदे,पियुष धुपे राज वर्मा ,मनोज तांबेकर, गुरु मोगरे, कुलदीप चंदनखेडे, सागर गदई, अक्षय चौधरी ,तुषार येरमे, राकेश पराडकर ,सुयोग, वर्षा बोंबले कल्पना ,युगल ठेंगणे, शुभम वांढरे, राकेश बोरीकर , सुमित करपे व संपूर्ण महाराष्ट्र सेनीक उपस्थित होते व या आंदोलनाला विशेष म्हणजे स्वराज्य रक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पोतराजे व आशिष ताजणे यांचा पाठिंबा लाभला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here