Home मुंबई ब्रेकिंग :- सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची व्हायरल स्क्रिप्ट चुकीची,

ब्रेकिंग :- सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची व्हायरल स्क्रिप्ट चुकीची,

महाराज आता ठणठणीत असून किर्तन प्रबोधनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचा मुलगा डॉक्टर धर्मपाल चिंचोलकर यांचा दावा.

मुंबई /अकोला :-

प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत चाकू हल्ला झाल्याची पोस्ट सध्या वायरल होत आहे. जी घटणा काही वर्षांपूर्वी झाली आहे. आता अस काहीही झालेल नाही. सत्यपाल महाराज यांचे पुत्र डाॅ. धर्मपाल चिंचोळकर यांनी वायरल होत असलेल्या हल्ल्याचे खंडण केले आहे. ” बाबा ठणठणीत असून , ते प्रबोधन कार्यक्रमात व्यस्त आहेत.” असे त्यांनी सांगितले आहे. कृपया हल्ला झाल्याची पोस्ट कुणीही वायरल करू नये अशी विनंती अ.भा.अं.नि.स. महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना त्यांनी केली आहे.

मुंबई येते शुक्रवार ला प्रशीद्ध किर्तनकार तथा सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्राणघातक हल्ला झाल्याची स्क्रिप्ट सद्ध्या सामाजिक माध्यमांवर झळकत होती. दरम्यान एवढा मोठा हल्ला होणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर हल्ला आहे अशी चिंता इथल्या पुरोगामी मंडळींना वाटतेय. काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करणाऱ्या अर्थात अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती,

अशातच समाज प्रबोधन करणाऱ्या  सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची स्क्रिप्ट समोर आल्याने सगळ्यां गुरुदेव भक्तांना व पुरोगामी विचारसरणी असणाऱ्यांना मोठा हादरा बसलाय त्यामुळं ही स्क्रिप्ट सामाजिक माध्यमांवर सगळीकडे पसरली होती मात्र असा कुठलाही हल्ला सत्यपाल महाराज यांच्यावर झाला नसल्याचे व सन 2017-18 च्या दरम्यान तसा हल्ला झाल्याचे सत्यपाल महाराज यांचे पुत्र डॉ. धर्मपाल चिंचोलकर यांनी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या संपादक राजू कुकडे यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here