Home क्राईम स्टोरी क्राईम  :- वरोरा शहरालगत असलेल्या विकास नगर येथे युवकांचा खून. 

क्राईम  :- वरोरा शहरालगत असलेल्या विकास नगर येथे युवकांचा खून. 

प्रेम प्रकरणातून केलेली मारहाण खुनात परावर्तित. पोलिसांचा कयास.

                                                                      वरोरा प्रतिनिधी:-

चंद्रपूर जिल्ह्यात खून हल्ले आता नित्याचीच बाब ठरत असून सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. नुकताच चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर मूल तेथे झालेला गोळीबार बघता अगोदरच पोलिसांची तारांबळ उडाली असतांना व त्या आरोपींचा शोध सुरू असतांना वरोरा येथील विकास नगर येथे 20 मे शनिवार रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास एका तरूणाची हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

रितेश लोहकरे राहणार विकास नगर असे मृतक युवकांचे नाव असून , हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास त्याला एका मित्राने फोन करून त्याच्या घरा जवळील पान शॉवर बोलावले. तिथे काही तरुण आधीच रितेशची वाट बघत होते. रितेश आणि त्या तरूणांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान त्यांनी रितेशवर काठीने हल्ला चढवला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

रितेशच्या मारणाऱ्यांना काही व्यक्तींनी बघितले असून सदर व्यक्तींचा शोध घेणं सुरू आहे. लवकरच मारेकऱ्यांना अटक करण्यात येईल. सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वरोरा पोलीस स्टेशनला भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली.

Previous article१८ शाळांत ९९ बालकांना आरटीईतून मोफत प्रवेश
Next articleब्रेकिंग :- सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची व्हायरल स्क्रिप्ट चुकीची,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here