Home चंद्रपूर ब्रेकिंग :- संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक.

ब्रेकिंग :- संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक.

आरोपी काँग्रेस कार्यकर्ते असल्याने मुख्य सूत्रधार गळाला लागणार का ? चर्चेला उधान, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

मागील काही वर्षात जिल्ह्यातील राजकीय गुंडगिरीला उधाण आले असून अवैध व्यवसायात असणाऱ्या सर्व गुंड प्रव्रुत्तिच्या लोकांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे चित्र दिसत आहे, अशातच सीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारांची चर्चा सुरू असतांना यामागे राजकीय ताकत आहे असा कयास लावला गेला होता, आता त्या चर्चेचे सत्य समोर आले असून बाबुपेठ येथील काँग्रेस समर्थित दोन भाऊ या गोळीबारातील आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान काल अटक करण्यात आलेल्या या आरोपींना दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले असल्याची विशेष सूत्रांकडून माहिती समोर आहे.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जवळपास नऊ पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेला पाठवून वेगाने तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान जे क्रिमिनल माइंड चे व खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे अशा गुंडांची वेगवेगळ्या पद्धतीने कसून चौकशी केली होत. या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकच्या अध्यक्षाच्या गाडीचा ड्रायवर याला सुद्धा तपासात घेतले होते संतोष रावत यांच्यावर गोळीबार झाला त्यामागची कारणे आता समोर येणार असून त्यात बैंक भरती करिता पैसे दिले, पण नौकरी मिळाली नाही आणि म्हणून आम्ही हल्ला केला असेही कारण आरोपी कडून येण्याची शक्यता आहे.

   या घटनेचा मास्टरमाईंड व सूत्रधार कोण ?

हा गोळीबार राजकीय वैमन्यशातून झाला असला तरी आरोपींना वाचविण्यासाठी मास्टरमाईंड किंव्हा त्यांचा सूत्रधार हा बैंकच्या व्यवहारांची कारणे समोर करणार आहे. या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक चे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांची सुद्धा पोलीस चौकशी झाली होती यावरून पोलिसांचा तपास योग्य दिशेने जातं असल्याचे दिसत आहे. आता या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण याबाबत पोलीस लवकरच तपास लावणार आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात तो मास्टरमाईंड व सूत्रधार कोण ? यावर पडदा पडून बुरखा पांघरूण कटकारस्थान रचणाऱ्याचा असली चेहरा समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here