Home चंद्रपूर धुळे येथील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या चंद्रपूरातील खेडाळुंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने...

धुळे येथील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या चंद्रपूरातील खेडाळुंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

धुळे येथे होणार असलेल्या अंडर १४ फुटबॉल स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा फुटबॉल संघाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व खेडाळुंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात सत्कार करण्यात आला असुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्र्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, सायली येरणे यांच्यासह प्रशिक्षकांची उपस्थिती होती.
फुटबॉल खेडणारे खेडाळु आता मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागले आहे. चंद्रपूरातही फुटबाॅल प्रेमींची संख्या लक्षणीय वाढत असुन फुटबॉल खेड प्रकाराकडे युवकांचा कल वाढला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या माता महाकाली क्रिडा महोत्सवातही राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूरच्या संघाने घवघवीत यश प्राप्त केले होते.
दरम्यान धुळे जिल्ह्यात आयोजित फुटबॉल स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील उत्तम खेडाळुंची निवड करण्यात आली आहे. सदर खेडाळूंना प्रोत्साहित करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर खेडाळुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित या सत्कार कार्यक्रमाला जिल्हा संघाचे सर्व खेडाळु व प्रशिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सर्व खेडाळुंचे अभिनंदन करण्यात आले असुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार कार्यक्रमला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here