Home चंद्रपूर खळबळजनक :- संतोष रावत यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी पकडले कसे ?

खळबळजनक :- संतोष रावत यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी पकडले कसे ?

आरोपींनी पोलिसांचीच कशी केली दिशाभूल ? वाचून व्हाल थक्क. पडद्यामागे कुणाचा हात ?

चंद्रपूर :-

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक चे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी वेस्टर्न कोलफील्ड मध्ये नौकरी लावून देतो म्हणून 6 लाख रुपये अडीच वर्षांपूर्वी घेतले पण नौकरी लावून दिली नाही व पैसे पण परत केले नाही, त्यामुळे रागाच्या भरात आम्ही संतोष रावत यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्लान तयार केल्याची बनावट तथा खळबळजनक माहिती आरोपींनी पोलिसांना दिली पण वेस्टर्न कोलफील्ड आणि संतोष रावत यांचा संबंध काय ? याबाबत मात्र कुठलेही सूत्र जुळत नसल्याने आरोपी राजवीर यादव व त्याचा भाऊ अमर यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलीस तपासात दिसत आहे. दरम्यान आरोपी यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले असतानाच खुद्द गाडीची नंबर प्लेट पेंटिंग करून देणाऱ्या पेंटरच्या माध्यमातून पोलीस स्टेशन मधे स्वतःहून माहिती दिल्यामुळे आरोपीची ओळख झाली व त्यांना पहाटे 2 ते 3 दरम्यान पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक चे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर मूल येथे दिनांक 11 मे ला जो गोळीबार करण्यात आला होता, त्याचा तपास तब्बल 12 दिवसांनंतर लागला व राजवीर यादव, अमर यादव या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली, दरम्यान या संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेतली. पण ज्या पद्धतीने पत्रकारांना सांगितले की पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला तो कौशल्यपूर्ण तपास नेमका काय होता ? आरोपींना पकडण्यात कुठली बाब कारगर ठरली याबद्दल मात्र त्यांनी सविस्तर उलगडा केला नाही, शिवाय  पोलीस आरोपी पर्यंत कसे पोहचले ? आरोपी कडून पिस्तूल व गाडी जप्त केली का ? आरोपीची राजकीय पार्श्वभूमी काय आहे याचा शोध घेतला का ? या प्रश्नांची उत्तरे सुद्धा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कटाक्षाने टाळली. मात्र आरोपींनी आम्ही संतोष रावत यांना वेस्टर्न कोलफील्ड मध्ये नौकरी लावून देतो म्हणून सहा लाख रुपये घेतले असल्याचा बयान दिला असल्याचे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले तेव्हा मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या व वेस्टर्न कोलफील्ड व संतोष रावत यांचा काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित झाला. दरम्यान या आरोपींनी पोलिसांचीच दिशाभूल केल्याची बाब आता उघड झाली आहे. मात्र हा प्राथमिक तपास आहे यानंतर आम्ही सविस्तर तपास करू असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी पत्रकारांना सांगितले.

जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व राजकीय पुढारी यांनी आपली अवैध व्यवसायात एकहाती सत्ता निर्माण करण्यासाठी राजकीय गुंड पोसले आहे व त्यांच्या माध्यमातून आपली दहशत तयार करून आर्थिक चांगभलं चालवलं आहे. दरम्यान याच राजकीय गुंडांचा प्रतिस्पर्धी यांना संपवण्यासाठी मोठ्या शिताफीने वापर करून त्यांनी आपली सत्ता निर्माण करण्याचं कौशल्य साधलं असल्याचं चित्र दिसत असतांना आता राजकीय अस्तित्वाच्या नादात जीव घेण्याच्या अंतिम निर्णयापर्यंत सुद्धा हे राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी पोहचले असल्याने त्यांच्याकडून जणू लोकशाहीची हत्त्या होत असल्याचं चित्र दिसत आहे.

यादव बंधूंच्या मागे ताकत कुणाची ?

फेसबुक पेज “माय चंद्रपूर “मध्ये लिमेश जंगम यांनी संतोष रावत गोळीबार प्रकरणात खासदार वाळू धानोरकर असल्याचे स्पष्ट केले आहे व त्याचा आधार सुद्धा जोडताना त्यांनी राजवीर यादव यांच्या फेसबुक माध्यमांवर असलेल्या पेजवर धानोरकर यांच्याकडून राजवीर यादव याला केक भरवतानाचा फोटो शेअर केला आहे, त्यामुळे आरोपी यादव बंधू मागे खासदार यांची ताकत आहे हे शिद्ध होते मात्र तपासात आता खरोखरच याबद्दल उलगडा होणार का ? यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here