Home Breaking News मी सांगतो गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचे नाव – संतोष रावत

मी सांगतो गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचे नाव – संतोष रावत

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  जिल्ह्यातील मूल शहरात 11 मे ला कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात कांग्रेसचे उत्तर भारतीय संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजविर यादव व त्याचा भाऊ अमर यादव यांना अटक करण्यात आली, वेकोली मध्ये नोकरी लावून देतो म्हणून संतोष रावत यांना पैसे दिल्याची बाब आरोपीने कबूल केली होती, मात्र नोकरी न लागल्याने आरोपीने पैसे परत मागितले असता त्यावर रावत यांनी प्रतिसाद दिला नसल्याने सदर प्रकरण घडले असं बयान आरोपीने पोलिसांना दिले.

मात्र आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर जात आहे, याबाबत संतोष रावत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मी आरोपीला ओळखत नाही व त्याचा माझा काही संबंध नाही असे जाहीर केले.

हा तर मोहरा आहे पण त्यामागील सूत्रधार दुसरा आहे, ज्या माणसाला मी ओळखत नाही त्याने असे पळवाटा काढणार बयान दिले कसे.

मुख्य सुत्रधाराचे नाव लवकर जाहीर करणार अशी प्रतिक्रिया रावत यांनी यावेळी दिली.

आरोपीची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी सुद्धा रावत यांनी यावेळी केली.

मंगळवारी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले की WCL मध्ये रावत यांनी नोकरी लावून देतो म्हणून काही युवकांकडून राजविर मार्फत पैसे घेतले होते, मात्र रावत यांचा वेकोली सोबत दूरपर्यंत संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र आता संतोष रावतांच्या प्रतिक्रियेनंतर हे प्रकरण पुन्हा गुंतागुंतीचे झाले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here