Home चंद्रपूर तारसा येथे ‘शासन आपल्या दारी’ शिबिर

तारसा येथे ‘शासन आपल्या दारी’ शिबिर

शासन आपला

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

मौदा:- शासनातर्फे शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रमांतर्गत गावागावांत शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. या अभियानांतर्गत तारसा (ता. मौदा) येथे ‘शासन आपल्या दारी’ शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावेळी तारसा, बाबदेव व चाचेर, निमखेडा जिल्हा परिषद गटातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. यात संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य शालिनी देशमुख, माजी महिला व बाल कल्याण सभापती नंदा लोहबरे, पं. स. सभापती स्वप्नील श्रावणकर, सरपंच वैशाली लेंडे, उपसरपंच चंद्रशेखर गभणे, शुभम गिरडकर, शुभम गभणे, पुष्पा बिधाने, प्रियंका डांगरे, गजानन डांगरे, जनार्दन येडणे, संगीता डहाके, दुर्गा येडणे, पल्लवी मोडघरे, नंदकिशोर देशमुख, किरण डांगरे, नलिनी राऊत, तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी विजय झिंगरे, सहायक गटविकास अधिकारी रोशन गुलाले, नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे, दिनेश निंबाळकर, टी. एस. नंदेश्वर, मंडळ अधिकारी राहुल भुजाडे, थुल, बोरकर, वानखेडे, लिपिक अपूर्वा चवरे, मंगेश सरोदे, रवींद्र वैरागडे, गोपाल चव्हाण, नीलेश भोले, प्रभू ढोबळे, अनिल लोहबरे, शुभम साहारे तसेच फुलचंद पिसे आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here