Home चंद्रपूर दखलपात्र :- राहुल माने संचालित ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल. कंपनी कायदेशीर?

दखलपात्र :- राहुल माने संचालित ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल. कंपनी कायदेशीर?

बदनामी केल्यास न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार, राहुल माने यांचा इशारा.

                                                                                         चंद्रपूर प्रतिनिधी :-

अँधेरी मुंबई येथील राहुल माने संचालित ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल. कंपनी ही नेटवर्क कंपनी असली तरी ती प्रॉडक्ट बेस म्हणजे उत्पाद विक्री करणारी कंपनी आहे आणि या कंपनी चंद्रपुर व विदर्भात काम करत आहे. दरम्यान या कंपनीत जवळपास 6 हजार लोकं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करताहेत त्यामुळे उत्पाद विक्रीतून पैसे कमावण्याची संधी बेरोजगार युवकांना व महिला पुरुषांना मिळत असल्याने या कंपनीकडून कुठलीही ग्राहकांची लूट होतं नाही पण कंपनीचे काही विरोधक प्रसारमाध्यमांत चुकीच्या माहिती पसरवून कंपनीची बदनामी करत आहे ती बदनामी आम्ही सहन करणार नाही आणि जे बदनामी करतील त्यांना न्यायालयात खेचू असा इशारा कंपनीचे प्रमुख राहुल माने यांनी दिला आहे.

या संदर्भात भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर “सावधान, पुन्हा मुंबई येथील नेटवर्क कंपनी आली चंद्रपूर लुटायला.” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती, त्यात राहुल माने संचालित ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल. कंपनी मार्फत पुन्हा एकदा चंद्रपूर व विदर्भातील जनतेच्या फसवणूकीचे रॅकेट सुसज्ज असल्याचा दावा करण्यात आला पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितली असता त्यात काही तथ्य नसल्याचे कळले असल्याने जनतेनी याबाबत कुठलाही संभ्रम पाळू नये व या कंपनीत सामील होऊन बेरोजगारी दूर होण्यास हातभार लागत असल्यास अवश्य सामील व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मल्टीलेवल नेटवर्क कंपनीच्या माध्यमातून चंद्रपुर तथा नागपुर येथील जनतेला समृद्ध जीवन, मैत्रेय, कलकाम, साईप्रसाद, साईंप्रकाश, मेट्रो विजन रियल ट्रेड सारख्या अशा अनेक कंपनीच्या माध्यमातून लाखो करोडो रूपयांनी लुटल्या गेले व त्यातून काहींनी आत्महत्या सुद्धा केली परंतु ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल. कंपनी ही पूर्णपणे उत्पाद विक्रीच्या व्यवसायातून कमिशन च्या रूपाने पैसा मिळवणारी कंपनी असून कंपनीचे स्वतःचे हेल्थ प्रॉडक्ट आहे. जसे अविश् अल्कलाइन वाटर बॉटल, माल्टा ज्यूस, बुरान्श नॅचरल ज्यूस इत्यादी उत्पाद आहे. त्यामुळे या कंपनीतून कुणाची फसवणूक होईल यांची शक्यात फ़ार कमी असल्याने या कंपनीची पुढे चांगली वाटचाल होईल अशी आशा कंपनीचे प्रमुख राहुल माने यांना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here