Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- पांच ठाणेका इन्चार्ज मेरे पासमे है, पत्रकार क्या कर...

क्राईम ब्लास्ट :- पांच ठाणेका इन्चार्ज मेरे पासमे है, पत्रकार क्या कर सकता ?

ताडाली एमआयडीसी परिसरात डिझेल चोरी करणारा शाकीर याचा पत्रकाराला अप्रत्यक्ष इशारा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पोलिसांच्या संरक्षणात अवैध धंदे कसे फोफावले यांचे ज्वलंत उदाहरणं नुकतेच पडोली ते ताडाली एमआयडीसी परिसरात समोर आले आहे, दरम्यान ट्रांसपोर्ट च्या गाड्यातील डिझेल चोरी करणाऱ्या शाकीर अंसारी यांची मागे नंबर प्लेट नसणारी टाटा सुमो ही पडोली वरून दिनेश चोखारे यांच्या dyani बार च्या समोर असणाऱ्या खुल्या जागेत जातं असतांना पत्रकारांना दिसली, ज्या गाडीत डिझेल चे ड्रम होते. या गाडीचा पाठलाग करत असतांना विडियो पण काढला होता पण आपला कुणी पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच गाडीतील दोन डिझेल चोर खाली उतरले व “मेरे सेठ चे बात करो” असे म्हणून त्यांनी डिझेल चोर शाकीर सोबत बोलायला लावले. त्यावेळी त्यांनी “आप पडोली आके मिलो” म्हणून पत्रकारांना पडोली येते बोलावले, परंतु शाकीर यांचा डिझेल चोरीचा व्यवसाय कसा आहे हे पाहण्याकरिता पत्रकारांनी त्या परिसराची पाहणी केली असता येथे अगोदरच एक सरदार उपस्थित होता व तिथे टाटा ची एक ड्रम मधून डिझेल वाहून नेणारी गाडी उभी होती आणि खाली भरलेले डिझेल चे ड्रम पण होते.

या संदर्भात पत्रकारांनी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांना सांगितले असता त्यांनी सरळ डिझेल चोर शाकीर ला फोन लावला तर त्यांनी सांगितले की पांच ठाणेका इन्चार्ज मेरे पासमे है, पत्रकार क्या कर सकता ? पत्रकार लोगोसे अपने को डरनेकी कोई बात नही म्हणून त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांचा फोन कापला. खरं तर डिझेल चोर पांच ठाणेदार यांच्या इन्चार्जचा खास असेल तर ठाणेदार यांची काय मजाल असेल की ते डिझेल चोर शाकीर ला अडवेल. जिथे सर्वसामान्य जनता न्यायासाठी वणवण भटकत असतांना पोलीस प्रशासन त्यांना न्याय देत नाही व दुसरीकडे चोरांना पाठबळ देतात तर मग ” सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीदाचा काय फोटो काढून दाखवायचा का ? असा सवाल विचारण्यास वाव आहे.

जिथे पोलीसच अवैध व्यावसायिकांना पाठबळ देऊन लाच खात असेल तर मग सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार कसा ? याबाबत शंकाच आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून अशा डिझेल चोराना पाठबळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व असले अवैध धंदे बंद करावे अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here