Home वरोरा उत्सव :- सालोरी गावात संत भीमा भोई जयंती उत्सव थाटात साजरा

उत्सव :- सालोरी गावात संत भीमा भोई जयंती उत्सव थाटात साजरा

समाजबांधवांनी एकत्र येऊन गावात काढली रैली. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन.

सालोरी प्रतिनिधी :-

समाजातील नवयुवक पुढे आले तर कशी क्रांती होऊ शकते यांचे उदाहरणं स्वांतंत्र्य लढ्यातील युवकांच्या लढ्यातून समोर येते, अशाच एका समाजातील उत्सवात नवयुवक पुढे आले आणि पाहता पाहता सगळा समाज पुढे आला. औचित्य होते संत भीमा भोई यांच्या जयंतीचे, वरोरा तालुक्यातील सालोरी या गावात भोई समाज मोठ्या प्रमाणात आहे पण आजपर्यंत समाजाचे आराध्य दैवत संत भीमा भोई यांची जयंती कधीही साजरी करण्यात आली नव्हती पण ओबीसी बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र सैनिक संदिप मोरे व महाराष्ट्र सैनिक तथा ओबीसी बहुजन महासंघ ग्रामीण उपसंघटक रंगनाथ पवार यांच्या पुढाकाराने तसेच गणेश तुमसरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने संत भीमा भोई यांची जयंती दिनांक 25 मे ला मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, सामाजिक नेत्या विशाखा राजूरकर. माजी पोलीस उपनिरीक्षक पद्माकर भोयर, पारबता बाई ढोक माजी स. प स. ट मु . अ. तुळशीराम मगरे, धर्मकिर्थी तेलतुंबडे, संभाजी तुमसरे , राजू रदई, हरेंद्र गोळेकर, सुनील बावणे, शुभम मगरे, दिलीप चौधरी, विलास रांदई यांसह सालोरी गावांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

संत भीमा भोई जयंती निमित्याने गावात रैली काढण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात महिला सामील झाल्या होत्या. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वाल्मीक मोरे, एकनाथ पढाल, विक्की तुमसरे, राहुल मोरे , सुमित मोरे, विनोद विमोरे सुनील मोरे सुमित पोईनकर, शुभम मोरे, वामन मोरे सुरेश मोरे, रमेश मोरे, दिलीप मोरे, सुखदेव मोरे, रामकृष्ण मोरे, घनशाम मोरे सूरज मोरे, अनुप तुमसरे, श्रावण तुमसरे ,राहुल पोइंनकर, अशोक दाते, सुभाष बावणे, प्रभुदास मोरे. विनोद श. बावणे, मधुकर मोरे नामदेव तुमसरे, विठ्ठल तुमसरे किसन मोरे प्रेम मोरे, गणपत तुमसरे, अतुल तुमसरे, विष्णुदास तुमसरे, नयन तुमसरे, आशिष मोरे ऋतिक मोरे, कुलदीप मोरे, सुधाकर तुमसरे गोविंदाजी मोरे तुळशीराम मोरे , प्रमोद पोईंनकर , अमित पोइंनकर घनशाम मोरे, महिला शार्धा बाई मोरे, म माया बाई मोरे, वर्षा तुमसरे व इतर महिला व समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here