Home चंद्रपूर चंद्रपुरात दोन गटांतील जुन्या वादातून निघाल्या तलवारी

चंद्रपुरात दोन गटांतील जुन्या वादातून निघाल्या तलवारी

 

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  जुन्या वादातून दोन गटांमध्ये तलवारी निघाल्याची घटना शुक्रवारी शहरातील चांडक मेडिकल जवळील अंजुमन मस्जीदजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी इमदाद अत्ता रहमान, मोहमद अतिक उर मुजीब रहमान, मोहमद शोएब मुजीब रहमान, सैफ उर अत्ता रहमान या चौघांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तर, इमदाद अत्ता रहमान हा जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.

फिर्यादी साहील फारुख कुरेशी व आरोपीमध्ये दीड महिन्यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी जुम्माचा दिवस

असल्याने ते सर्व जण नमाज पठण करण्यासाठी अंजुमन मस्जीदजवळ गेले. नमाज पडून झाल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्या वाद सुरू झाला. यावेळी फिर्यादीला मारण्यासाठी दुसऱ्या गटाने तलवार काढली.

मात्र, फिर्यादीला तलवार न लागता त्यांच्याच गटातील इमदाद अत्ता रहमान याला तलवार लागल्याने तो जखमी झाला. फिर्यादी साहील फारुख कुरेशीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल स्थूल करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here