Home Breaking News चंद्रपूरमध्ये जिल्हा स्टेडियम येथे खेळाडूंचे एकदिवसीय धरणे आंदोलन

चंद्रपूरमध्ये जिल्हा स्टेडियम येथे खेळाडूंचे एकदिवसीय धरणे आंदोलन

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके जिंकून भारताचा नावलौकिक जगभर करून दिल्यानंतरही आज जंतरमंतर दिल्ली येथे कुस्तीगीर मुली आणि काही पुरुष पैलवान बसून न्यायाची मागणी करत आहेत. न्यायाच्या मार्गावर महिनाभर चालणारे आंदोलन जर होत असेल तर आपल्या देशातील क्रीडा आणि खेळाडूंसाठी या घटनेपेक्षा दुःखद काहीही होऊ शकत नाही.

आज जवळपास संपूर्ण देश या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उभा राहिला असून या मालिकेत चंद्रपूरमध्ये चंद्रपूरचे पहिले आंतरराष्ट्रीय आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश नायडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो खेळाडू जिल्हा स्टेडियम येथे ठिय्या मांडून एक दिवसाचा संप करून कुस्तीपटूंना पाठिंबा देणार आहे. या साठी 30 मे रोजी स्थानिक

जिल्हा स्टेडियमच्या गेटवर पुढील मागण्यांसह आंदोलन करण्यात येणार आहे.

1. लैंगिक शोषण आणि POSCO चे आरोप असलेले बाहुबली आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे भ्रष्ट खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना तात्काळ अटक करा.

2. देशातील सर्व क्रीडा संघटनांपैकी खेळाडू नसलेले, भ्रष्ट आणि गंभीर आरोप असलेले अधिकारी आणि सदस्यांना राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावरील संघटनेतून वगळण्यात यावे.

3. महिला खेळाडूंना सरावासाठी, स्पर्धेदरम्यान आणि त्यांच्या मुक्कामासाठी, रहदारीच्या वेळी विशेष आणि योग्य व्यवस्था आणि सुरक्षेसाठी कायदा करण्यात यावा, असे न केल्यास आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत इ.

हे आंदोलन मंगळवार 30 रोजी सकाळी 7:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत जिल्हा स्टेडियमच्या गेटवर होणार असून यामध्ये चंद्रपूरच्या सर्व जनतेने, क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक राजेश नायडू यांनी केले आहे.

Previous articleचंद्रपुरात दोन गटांतील जुन्या वादातून निघाल्या तलवारी
Next articleमनपा तर्फे बीजेएम कार्मेलला स्वच्छतेचा द्वितीय पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here