Home चंद्रपूर चंद्रपुरातील ऑटोचालकाच्या मुलीने मिळविले दहावीत ९२.२० टक्के गुण

चंद्रपुरातील ऑटोचालकाच्या मुलीने मिळविले दहावीत ९२.२० टक्के गुण

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

विसापूर :- वडील ऑटोचालक, आई शिवणकाम करून संसाराचा गाडा हाकते. घरची परिस्थिती बेताची तरी जिद्दीने अभ्यास करून कोणतीही शिकवणी वर्ग न लावता नांदगाव पोडे येथील आयुषी गुलाब उपरे हिने दहावीच्या परीक्षेत ९२.२० टक्के गुण घेऊन यश संपादन केले.

लोकमान्य कन्या विद्यालय चंद्रपूर येथे शिकणारी आयुषी ही नेहमी नांदगाववरून चंद्रपूरला शिक्षणासाठी ये-जा करायची. प्रवासाचा कोणताही बाऊ न करता ग्रामीण भागात राहून ती

घरी आईला घरकामात मदत करत असे व नंतर ती निरंतर आपला अभ्यास करत असे.

शिकवणी वर्ग न लावता तिने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले. तिच्या या उत्तुंग भरारीचे नांदगाव पोडेमध्ये कौतुक होत आहे. तिचे यश बघता बाजार समिती उपसभापती गोविंदा पोडे व सामाजिक कार्यकर्ता पिंटू देऊळकर, सुनील आवडे, नरेंद्र आमने, अनिल उरकुडे, संदीप परसूटकर, दिवाकर उपरे, राघोबा आमने आदींनी तिचा घरी जाऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here