Home चंद्रपूर जागतिक पर्यावरण दिन व पत्रकारांचा स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न.

जागतिक पर्यावरण दिन व पत्रकारांचा स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न.

डिजिटल मिडिया संधी आणि आव्हाने या देवनाथ गंडाटे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य पत्रकार संपादक संघ व नवक्रांती प्रबोधिनी विकास संस्था द्वारे आयोजीत जागतिक पर्यावरण दिन व पत्रकारांचा स्नेहमिलन सोहळा नवीन चंद्रपूर येथील सर्च फाउंडेशन चे इंजि,दिलीप झाडे यांच्या “कॉमन फॅ्सिलिटी सेंटर तनिषा गार्डन रोड, यशवंतनगर म्हाडा चंद्रपूर.” येथे साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले व पर्यावरण जल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील चिलविलवार यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान पत्रकारितेत पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या दैनिक पुण्य नगरीचे माजरी प्रतिनिधी रवि भोगे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. दरम्यान “डिजिटल मिडिया संधी आणि आव्हाने.” या देवनाथ गंडाटे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

जिल्ह्यात पर्यावरणावर काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आज पाहीजे त्यां प्रमाणात प्रशासनाकडे पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता पुढे येत नाही पर्यायाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणांत कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचा जनतेच्या आरोग्यावर होतं असून जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पर्यावरण दिनी एक संकल्प घेऊन येणाऱ्या काळात पर्यावरणासाठी हरित चळवळ चालविण्याचा माणस या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर आणायचा होता व यासाठी सर्व पर्यावरण प्रेमींच्या एकजूटीतून प्रदूषणावर मात करून चळवळ सुरू करायची असल्याचे मत या कार्यक्रमाचे आयोजक राजू कुकडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे. ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक अनुप यादव, विदर्भ प्रिंट चे जिल्हा प्रतिनिधी डी एस ख्वाजा, पद्माकर भोयर, विशाखा राजूरकर, विनोद दुर्गे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश सोलपन, अनिल देठे, विनोद पन्नासे, पुरुषोत्तम चौधरी, सुनील गुड, मनोज तांबेकर, पीयूष धूपे, राज वर्मा. राहुल देवतळे व असंख्य पत्रकार बंधूची उपस्थिती होती.

Previous articleचंद्रपुरातील ऑटोचालकाच्या मुलीने मिळविले दहावीत ९२.२० टक्के गुण
Next articleअहो, वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब, वनविभागाचे सागवान फुकटात मिळते का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here