Home चंद्रपूर अहो, वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब, वनविभागाचे सागवान फुकटात मिळते का ?

अहो, वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब, वनविभागाचे सागवान फुकटात मिळते का ?

त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चंद्रपूरचे सागवान फर्निचर पैसे न देताच पळवले ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा हा वनाने नटलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जातो आणि नुकतेच अयोध्येत राममंदिर बांधकामासाठी येथील मौल्यवान सागवान अयोध्येत पाठवल्या गेले. राममंदिर करिता पाठवलेले सागवान हे काही सूट देऊन कमी किंमतीत देण्यात आले खरे, पण एका पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क येथील सागवानाचे फर्निचर बनवून तर घेतले पण त्या फर्निचरचे पैसे न देताचं ते आपल्या जिल्ह्यातील घरी पळवले, या संदर्भात पोलीस विभागात आश्चर्य व्यक्त होत असून अहो वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब सागवान व फर्निचर फुकटात मिळते का ? असा प्रश्न त्या पोलीस अधिकाऱ्याला सर्वसामान्य जनता विचारत आहे.

पोलीस विभागात असलेले अधिकारी हे स्वतःची सर्वत्र सत्ता असल्याप्रमाणे वागतात आणि फुकटात जे मिळतं ते मिळविण्याचा प्रयत्न करतात अशी आजवरची परिस्थिती राहिली आहे. परंतु चक्क वनविभागातून पैशांनी खरेदी करण्यात आलेल्या सागवानाचे फर्निचर एका व्यापाऱ्यांकडून बनवल्यानंतर त्यांचे पैसे न देता फुकटात पळवणे म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराने सर्वच मोफत हवंय का ? असा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान या प्रकरणी फर्निचरचे फोटो भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल समूहाला मिळाले, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या गंभीर प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री दखल घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होतं असून पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा अशोभनीय वर्तणुकीने पोलीस विभागाची छबी खराब झाली असल्याचे बोलल्या जातं आहे. दरम्यान त्याबाबत पुन्हा काय काय गुपित समोर येईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

त्यां वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला कनिष्ठ अधिकाऱ्याला दम ?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी सागवानाचे फर्निचर बनवले होते पण त्यांना वाटत होते की तो फर्निचर बनविणारा व्यापारी कदाचित चोरीचा सागवान आणत असेल त्यामुळे त्याला पैसे दिले नाही तरी चालेल पण त्यां व्यापाऱ्याने त्यां वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन करून फर्निचरचे पैसे मागितले आणि त्यां वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आत्मा खळबळला आणि त्यांनी चक्क आपल्यां कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन करून तू कसा ठाणं चालवतो ते बघतो असा दम दिला. याबाबत आता पोलीस विभागात तर्क वितर्क लावले जातं असून अशा अशोभनीय भ्रष्ट व्यवहाराची सर्वत्र निंदा होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here