Home चंद्रपूर अजबगज :- शिफारस, लोटांगण व लक्ष्मी द्याल तर मिळणार पोस्टिंग?

अजबगज :- शिफारस, लोटांगण व लक्ष्मी द्याल तर मिळणार पोस्टिंग?

हे काय राव? सरकारी विभागात हा कसला फंडा ?

चंद्रपूर ;-

जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारण यात नेहमीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका असणाऱ्या एका सरकारी विभागात मोठा गोंधळ निर्माण झाला असून राजकारण, समाजकारण करणाऱ्यांच्या पलीकडे जाऊन इथे आगळीवेगळी भूमिका बघावयास मिळतं आहे. दरम्यान शिफारस, लोटांगण व लक्ष्मी द्याल तर मिळणार पोस्टिंग? असे ब्रीद या सरकारी विभागात रूढ झाल्याने सर्वसामान्यांचा हा विभाग जणू चक्रव्यूहात सापडला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राजकीय नेते आंदोलने करून अनेक उठाव निर्माण करतात व नंतर तडजोड करून स्वतःची तिजोरी भरतात, अर्थात राजकीय चमकोगिरी करून आपलं आर्थिक चांगभलं करणारे नेते आहेत त्याच प्रमाणे आता सरकारी विभागात सुद्धा हेच फंडे वापरून अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी यांचा राजकीय व्यक्तिसारखा गेमप्लॅन दिसत आहे. जिल्ह्यातील या विभागात पोस्टिंग पासून ते शिफारस केंद्र पर्यंत सेटिंग सुरू झाली आहे. त्याकरिता तुम्हाला(प्रशासन) पोस्टिंग हवी असल्यास ज्या आणि त्या विशेष व्यक्तीला प्रलोभन आणि शिफारस साठी लोटांगण घालण्याची वेळ आल्याचे गंभीर चित्र पाहावयास मिळत आहे. दृढ आणि विश्वास संपादन केलेल्या अधिकाऱ्याला लक्ष्मी प्रसाद घेऊनच त्या ठिकाणची मेजवानी दिली जात आहे. प्रशासनातील पूर्वी अधिकारी हे स्वतःच्या कर्तव्याच्या (चांगल्या कामाच्या आधारे) आधारे आपली प्रशासनिक सेवा देत होते. मात्र दिवसेंदिवस नातेवाईक,मित्र,आणि वाटेल तो मर्जितला अधिकारी ज्यांची योग्यता नसतानाही त्यांची वर्णी लावल्या जात आहे. जर या डावपेचात तुम्ही सक्षम किंव्हा हुशार नसाल तर तुम्हाला लूप – लाईन (साईड ब्रांच) ला बसविण्यात येत आहे. योग्य अधिकारी राहूनही त्याला जर लूप लाईन कराव लागत असेल तर ते नशीब नाही तर त्यांची अर्थकारणाच्या डावपेचात घेतलेला एक प्रकारचा बळीच आहे.

जिल्ह्यात पोस्टिंग ते वसुली ठेकेदारी पर्यंत निरनिराळ्या घटना घडत आहे व त्यासाठी कमिशन, चाफ्लुसी, लोटांगण, वाह वाह,भाऊ,दादा,साहेब,करत करत सध्या अनेक विशेष व्यक्ती हमी भरून अधिकाऱ्यांना सुचवत आहे.जिल्ह्यात काही दिवसातच अनेक घडामोडी दिसणारच आहे दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपूर लगतच्या एका ठिकाणी पोस्टिंग हवी असेल तर त्या व्यक्तीचे शिफारस पत्र आणि त्यांची विशेष मुलाकात घेऊन आभार घेण्याचा स्तुत्य उपक्रम नोंदवला गेला आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे पोस्टिंग करायलाही आज अश्या परिस्थितीत हे कार्य करणे म्हणजेच भामटेगिरीचे ज्वलंत उदाहरण आहे. नको त्या अधिकाऱ्यांना जिथे तिथे पोस्टिंग देऊन जिल्ह्याचा आधीच भ्रष्ट धूर उडत आहे , आणखी त्यात भर म्हणजे शिफारस आणि लक्ष्मी दर्शन झाल्या शिवाय पोस्टिंग मिळतं नसल्याने कसं काय राव?हे म्हण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here