Home चंद्रपूर क्राईम :-अल्पवयीन मुलांच्या डोक्यावर क्रिकेट बॅटने वार करून हत्त्या.

क्राईम :-अल्पवयीन मुलांच्या डोक्यावर क्रिकेट बॅटने वार करून हत्त्या.

दफन केलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून केले शवविच्छेदन. पोलिसांना सूचना न दिल्याने डॉक्टरांवर होणार का गुन्हा दाखल?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलांच्या डोक्यावर बॅटने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून ज्या खाजगी रुग्णालयात जखमी अवस्थेत मुलाला उपचारासाठी भरती करण्यात आले त्यां खाजगी डॉक्टरांनी पोलिसांना कळवले नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अखेर मृतक मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दफनविधी झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी ही घटना लपवून ठेवणाऱ्या त्यां खाजगी डॉक्टरांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होतं आहे.

दिनांक 3 जूनला चंद्रपूर शहरातील बगडखिडकी परिसरात काही मुले क्रिकेट खेळत होते. खेळण्यावरून दोन गटात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅट ने वार केला. तो मुलगा जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना त्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या परिवाराकडून अंतिमसंस्कार करून मृतदेह दफन केला मात्र मृतक मुलाच्या आईने 6 जून ला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येबाबत तक्रार नोंदविली व त्यां तक्रारीनंतर खूनाचा चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतक मुलाचा जमिनीत पुरलेल्या मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला परंतु जखमी अवस्थेत उपचारासाठी आलेल्या मुलाची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली नसल्याने त्यां खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर पण गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होतं आहे.

Previous articleअजबगज :- शिफारस, लोटांगण व लक्ष्मी द्याल तर मिळणार पोस्टिंग?
Next articleनियमभंग करणाऱ्या शहरातील हॉटेल रेस्टॉरंट, बिअर बार, वाईन शॉप व देशी दारूच्या दुकानांवर कारवाई करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here