Home चंद्रपूर नियमभंग करणाऱ्या शहरातील हॉटेल रेस्टॉरंट, बिअर बार, वाईन शॉप व देशी दारूच्या...

नियमभंग करणाऱ्या शहरातील हॉटेल रेस्टॉरंट, बिअर बार, वाईन शॉप व देशी दारूच्या दुकानांवर कारवाई करा.

मनसे जनहित कक्षाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मागणी.

चंद्रपूर:-

शहरातील परवाने धारक हॉटेल रेस्टॉरंट बिअर बार वाईन शॉप व देशी दारूची दुकाने ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत उघडत व बंद करत नसून सकाळी सात वाजेपासून तर रात्री उशिरा पर्यंत वरील सर्व दुकाने सुरू असतात विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात मद्यपींना परवाने उपलब्ध करून दिले नसल्याने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या अटी व शर्ती ची पूर्तता कुणीच करत नसल्याने शहरात शांतता सुव्यवस्थे ला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे वरील सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी मनसे जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुडे यांच्या नेत्रुत्वात मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्याकडे केली आहे.

शहरात देशी दारूची दुकाने व बार अँड रेस्टॉरंट हे सकाळीच सुरू राहत असल्याने त्या त्या परिसरातून जाणाऱ्या शाळेकरी मुलींना व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वेळीच प्रतिबंध लावावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहीत कक्ष व विधी विभाग या संदर्भात मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जनहित कक्ष विभागाचे अध्यक्ष सुनील गुडे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. पीयूष धूपे,विजय तुर्क्याल राज वर्मा व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous articleक्राईम :-अल्पवयीन मुलांच्या डोक्यावर क्रिकेट बॅटने वार करून हत्त्या.
Next articleप्रत्येक आजाराचे निशुल्क निदान करण्यासाठी या महा आरोग्य शिबिराचे आयोजन – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here