बाबुपेठ येथील महा आरोग्य शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:-शासनाच्या वतीने लोकप्रतिनीधींना मिळणारा मोठा निधी विविध विकासकामांवर खर्च होतो. मात्र आरोग्यावर फार कमी निधी खर्च केला जातो. त्यामुळे आता आपण यात बदल करण्याचा निर्धार केला असुन विकासकामांबरोबरच मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दिशेने आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. या अंर्तगत शहरातील विविध भागात 10 आरोग्य शिबिरे संपन्न होणार असुन प्रत्येक आजाराचे निशुल्क निदान करण्यासाठी हे महाआरोग्य शिबिर असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने बाबुपेठ येथील इग्लाज भावानी शाळेत आयोजित आरोग्य शिबिराचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, मनपा उपायुक्त अशोक गराडे, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. शुभांकर पीदुरकर, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटक वंदना हातगावकर, सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, माझी नगरसेवक प्रदिप किरमे, नंदा पंधरे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपण यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन अनेक आरोग्य शिबिरे आयोजित केले आहे. मात्र यंदा महानगर पालिकेच्या यंत्रणेच्या उपयोग करत 10 आरोग्य शिबिराचे आपण आयोजन केले आहे. आज बाबुपेठ येथील दुसरे शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरात येणा-या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्लड प्रेशर, ई.सी.जी, मँमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, मोफत औषधी व तपासणी, बाह्यरुग्ण सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, सिकल सेल चाचणी यासह इतर तपासण्या या शिबिरात केल्या जाणार आहे. सोबतच आवश्यक त्या औषधीही आपण या शिबिरात उपलब्ध करुन देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी केले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक बबलु मेश्राम, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल कातकर, कल्पना शिंदे, आशा देशमुख, माधुरी निवलकर, निलिमा वनकर, कविता निखाडे, शमा काजी, दर्शान चापले, माजी नगर सेवक हणुमान चौके, महेश वासलवार, मुकेश गाडगे आदींची उपस्थिती होती.
सदर तपासणी करिता आलेल्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ई – गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात येणार आहे. तसेच सदर शिबिरामध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पूढचे शिबिर 15 व 16 जून ला बाबूपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे.