Home वरोरा खळबळजनक :- स्व. खासदार धानोरकर यांचा सहकारी काशिफ़ शेख यांच्यावर तडीपारची कारवाई.

खळबळजनक :- स्व. खासदार धानोरकर यांचा सहकारी काशिफ़ शेख यांच्यावर तडीपारची कारवाई.

रेती माफियांचे धाबे दणाणले, काशिफ़ यांच्यावर एक वर्षांसाठी तडीपारीची कारवाई.

वरोरा प्रतिनिधी :-

स्वर्गीय बाळू धानोरकर यांच्या राजकीय व व्यावसायिक कामात नेहमीच विश्वासू म्हणून काशिफ़ (खान) रऊफ शेख यांच्यावर विशेष जबाबदारी होती, मात्र रेती कोळसा या दोन व्यवसायात त्यांना मोठी जबाबदारी मिळाली असल्याने त्यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून अवैध रेतीचा व्यवसाय थाटला होता, दरम्यान महसूल व पोलीस प्रशासनाने या प्रकरणी त्यांचेवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. पोलीस स्टेशन, वरोरा यांनी अधिनस्त पोलीस स्टॉफचे मदतीने मागील दिड वर्षाचे कालावधित वारंवार छापे घालुन ०९ गुन्हे नोंद केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त दंगा करणे, सामान्य लोकांना शिविगाळ करून धमकावणे अशा प्रकारचे सुध्दा गुन्हे त्यांचेवर नमुदअसल्याने त्यांच्यावर तडीपार करण्याची कारवाई झाली असल्याची खळबळजनक माहिती पोलीस विभागाच्या प्रशिद्धि पत्रकाद्वारे समोर आली आहे.

वरोरा शहरातील रहिवाशी तथा रेती माफिया कासिफ रऊफ शेख, वय ३७ वर्षे, रा. विठ्ठल मंदिर वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर हा अवैधरित्या रेती तस्करी करीत होता. त्याचे विरुध्द आयुष नोपानी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी तसेच अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, वरोरा आणि दिपक खोब्रागडे, तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, वरोरा यांनी अधिनस्त पोलीस स्टॉफचे मदतीने मागील दिड वर्षाचे कालावधित वारंवार छापे घालुन ०९ गुन्हे नोंद केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त दंगा करणे, सामान्य लोकांना शिविगाळ करून धमकावणे अशा प्रकारचे सुध्दा गुन्हे रेती माफियाचे विसध्द नोंद आहेत.

काशिफ़ खान उर्फ शेख विरुध्द नोंद गुन्हयांचा तपास करून दोषारोप पत्र संबंधित न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. परंतु नमुद रेती तस्कराचे वर्तणुकीत अंशतः सुध्दा बदल झाला नाही. त्यामुळे त्याचे विरुध्द कलम ५६ (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे हदपार प्रस्ताव ठाणेदार पो.स्टे. वरोरा यांनी तयार करून पुढील कार्यवाहीस सादर केला होता. रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे आयुष नोपानी, सय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी प्रस्तावासंबंधाने विस्तुत चौकशी करून तो प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, वरोरा यांचे कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकारी, वरोरा यांनी उभय पक्षाचे युक्तीवाद ऐकुन जिल्हा दंडाधिकारी, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे प्रकरणाची सुनावणी पुर्ण केली व वरोरा शहरातील रहिवाशी तथा रेती माफिया कासिफ रऊफ शेख, वय ३७ वर्षे, रा. विठ्ठल मंदिर वार्ड, वरोरा यास चंद्रपुर जिल्हयातुन एक वर्षाकरीता हदपार करीत असल्याचे आदेश दिनांक १९/०६/२०२३ रोजी पारित केलेले आहेत. या कार्यवाहीमुळे रेती तस्कर व गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here