Home भद्रावती धक्कादायक :- युवकाचा खून करून मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली पुरला.

धक्कादायक :- युवकाचा खून करून मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली पुरला.

भद्रावती तालुक्यातील धक्कादायक घटना, दोन दिवसांनंतर प्रकरण आले उजेडात.

भद्रावती प्रतिनिधी :-

तालुक्यातील चालबर्डी या गावांतील एका युवकाला मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला असता आरोपीने रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील घटना ही 17 जून ला समोर आली, दरम्यान वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतक अनिल मत्ते हा कोंढा येथून परत येत असतांना चालबर्डी गावाचे बसस्टॅन्ड जवळ, भोजरी येथे गावातील विजय रामदास मते यांनी आपल्या खाजगी कामासाठी मातीचा ढिग रस्त्यावर टाकुन ठेवला होता. त्यावेळेस तेथे गावातील निशांत झाडे, अमोल बाबा ऊपरे, बंडु डाऊले व करण खापणे तेथे आलेले होते. त्यावेळेस रस्त्यावर मातीचा ढिग करून रस्ता बंद केल्याचे कारणावरुन विजय मत्ते यांचेसोबत त्यांचा झगडा झाला व ते निघुन गेले. मात्र अनिल मत्ते हा तेथेच होता. त्यावेळेस विजय मत्ते याने अनिल ला मारहाण केल्याने तो तेथेच जागेवर पडुन राहीला. व मोटार सायकल स्प्लेंडर क्र MH-34-AD-2474ही देखिल तेथेच लागुन होती.

दरम्यान गावाचे सरपंच विजय खंगार यांनी विजय मत्ते याला रस्त्यावरिल ढिग काढुन घेण्याचे सांगितले व विजय मत्ते याने 21.30 चे सुमारास एम्टा साइडीग येथून एक डोझर बोलावुन घेतला. त्या डोझरवर मंगेश रामचंद्र उपरे रा. विजासण, भद्रावती हा ऑपरेटर होता. त्यावेळी त्यांनी माती रस्त्याच्या कडेला ढकलण्यापुर्वी अनिल रस्त्यावर पडुन होता ही संधी साधून आरोपी विजय मत्ते यांनी अनिलला जिवंत असताना त्याच्या अंगावर जाणीपूर्वक मातीचा ढिगारा ढकलुन दिला व त्याचा खून केला. विशेष म्हणजे याबद्दल डोझर चालक मंगेश रामचंद्र उपरे व आरोपी विजय मत्ते यांच्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती झाली नसल्याने कुटुंबातील व्यक्तीनी अनिल चा शोध घेतला असता तो मातीच्या ढिगाऱ्याखाली असावा अशी शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली व त्यांच्या तक्रारीवरून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलेला मृतदेह बाहेर काढून त्यांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले व आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here