Home Breaking News मनपातील सर्व ठिकाणातल 37 कंत्राटी कामगार मनपात स्थायी होणार तर पाणी पुरवठातील...

मनपातील सर्व ठिकाणातल 37 कंत्राटी कामगार मनपात स्थायी होणार तर पाणी पुरवठातील का नाही?

 

चंद्रपूर  :-  महानगरपालिका अंतर्गत पाणीपुरवठा योजना खाजगीकरण रद्द करण्यासाठी काही माजी नगरसेवकानी विरोध केलेला आहे, चांगला निर्णय घेतला आहे. यात शंका नाही
परंतु पाणीपुरवठा यंत्रणा मध्ये कार्यरत असलेल्या कामगाराच्या समस्या काय आहे हे कोणीतरी जाणून घेण्यासाठी तयार आहेत का हा प्रश्न कामगारां समोर उपस्थित होत आहेत, ज्या वेळी मनपा 2006 पासून कार्यरत असलेल्या कामगारांना स्थायी करण्याच्या आदेश काढला आहे तर मग पाणीपुरवठातील मधील कामगार तर 2004 पासून कार्यरत आहे.मग या कामगारतील एकही कामगारला मनपा का स्थायी करत नाही मनपा तील अधिकारी किव्हा आयुक्तांना यांच्या बदल विसर पडला का ? सध्याच्या स्थितीत ना घर के ना घाट के अशी या कामगारांची दशा सुरू आहे,
नाव मोठे दर्शन खोटे ,मनपाच्या नांवाने काम खाजगीकरण पगार,
किमान वेतन गेला कोठे?

हा तर प्रश्न मनपा समोर उपस्थित करावेत ?
नंतर खाजगीकरण रद्द करण्यास विरोध करावे,ही गंभीरता कामगाराच्या मनात निर्माण झाला आहे,
ह्या अगोदर उज्ज्वल कॉन्ट्रक्शन कंपनीने केलेल्या भोंगळ कारभार केल्याचा उल्लेख केला आहे ,
निष्कर्ष :- या अगोदर गुरुकृपा असोसिएट कंपनी होती ती कुणालाही दानापानी देत नव्हती नंतर उज्जवल कंपनी आली ती काहींना दानापानी देत होती,काहींना दानापानी देत नसल्याने कंपनी यंत्रणा व्यवस्थित चालत नव्हती म्हणून नावापुरते विरोध करत होते,

परंतु महत्वाचे सविस्तर माहिती

1.सन 2004 पासून नगरपरिषद पासून ते महानगरपालिका पर्यंत
म्हणजे:-2019पर्यंत एकातरी नगरसेवकानी किंवा आमदार,खासदारानी पाणीपुरवठा योजना मध्ये कार्यरत असलेल्या कामगारांबाबत समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी कोणीतरी समोर आले होते का ? आणि आता तरी कामगारांच्या समस्या काय आहे? या कामगारांना मनपा का समावून घेत नाही याबाबत कामगारांसोबत चर्चा केली काय?
सन2004–पगार 1200 ते 1260/-रुपये
सन2023–पगार12000 ते ,-14000/-अंदाजे एवढ्या पगारात आजही गरीब कामगार मजबुरीने काम करीत आहे, (फक्त लग्न केले स्वतःची प्रगती केली नाही)
कामगारांने 21वर्ष निव्वळ आज उद्या तरी कमीत कमी किमान वेतन मिळेल या आशेने आतुरतेने वाट पाहत आहेत, काही कामगार घरी बसले आहे,काही कामगार फक्त शासनाच्या नियमात येऊन ठेपली व रिटायर्ड झाले.

        फक्त एकच नियम लागू आहे ते म्हणजे रिटायर्ड

बस कमी पगार घ्या व घरी बसा अशी दुर्दशा कामगारांची केलेली आहे, हे सर्व शासन प्रशासन कायदा अंतर्गत कामगारांना किमान वेतन प्रमाणे पगार मिळत नाही हे माहीत असूनही सुध्दा बघ्याची भूमिका घेऊन कामगारांचे शोषण करीत आहेत,

        पाणीपुरवठा योजना यंत्रणा चे मुख्य सूत्रधार कोण ?

उत्तर :-  फक्त कामगार ,,,कामगार
संपूर्ण शहरात पाणीपुरवठा ऊन,वारा पाऊस तुफानी वादळांना नघाबरता सुरळीत चालू ठेऊन मनात नाराज राहून सुध्दा कर्तव्यदक्ष कार्यरत आहे.येथील कामगार आपल्या चंद्रपूर करासाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here