Home चंद्रपूर पाणी पुरवठातील खाजगीकरणाच्या गैरसमज मनपा आयुक्त विपिन पालीवार

पाणी पुरवठातील खाजगीकरणाच्या गैरसमज मनपा आयुक्त विपिन पालीवार

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  शहर पाणी पुरवला योजना सदर योजनाचा मे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि.चंद्रपुर यांचेमार्फत खाजगी तत्वावर चालविण्यात येत होती. सन २०१९ पासुन सदर योजना महानगरपालिकेने स्वतःचे ताब्यात घेतली. परंतु योजने महानगरपालिकेने स्वतःचे ताब्यात घेतल्यापासुन महानगरपालिके कडे आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे कंत्राटदार नेमूण आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करण्यात येत असुन पाणी पुरवठा योजना चालविण्यात येत आहे.

पाणी पुरवठा योजना मे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि., चंद्रपुर मार्फत खाजगी तत्वावर चालविण्यात येत असतांना योजनेची देखभाल दुरुस्ती पाणी शुध्दीकरणाकरीता लागणारे आवश्यक रसायने, पाणी कराची वसुली व आवश्यक मनुष्यबळ पुरवठा सदर कंपनीमार्फत करण्यात येत होता.

सदर योजना कंत्राटी पध्दतीने चालविण्याकरीता निविदा नुकतीच प्रसारीत करण्यात आली असुन सदर निविदा पाणी पुरवठा योजनेचे खाजगीकरणाबाबत असल्याचे नागरिकांमध्ये गैरसमज आहे. परंतु सदर निविदा पाणी पुरवठा योजनेतील ईरई धरण,ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल,इत्यादी कंत्राटी पध्दतीने चालविण्याबाबतची असून पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती पाणी कराची वसुली, व्हालमन, आवश्यक रसायन पुरवठा तसेच इतर आवश्यक कामे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here