Home Breaking News सुभाष धोटे हेच चंद्रपूर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष

सुभाष धोटे हेच चंद्रपूर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेले प्रकाश देवतळे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या कार्यवाहीला एआयसीसीने बंदी घातल्याने निर्माण झाली. या गदारोळात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुभाष धोटे हेच अद्यापही या पदावर असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे महासचिव विनोद दत्तात्रेय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

एआयसीसीच्या पत्राच्या आधारे निलंबित जिल्हाध्यक्ष देवतळे हे या पदावर पुन्हा आपला दावा मांडत आहेत. ते पत्र दि. २९ मे रोजी दुपारी १२ वाजेचे आहे. त्यानंतर राज्य अध्यक्ष पटोले यांची राष्ट्रीय सरचिटणीस के सी. वेणुगोपाल यांच्याशी फोनवर चर्चा झाली. या संभाषणानंतर एआयसीसीचा निकाल स्पष्ट झाला आणि त्याच दिवशी म्हणजे दि,21,मे रोजी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला. या संदर्भात अधिकृत पत्रही देण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसकडून येत्या दोन दिवसांतच परिस्थिती स्पष्ट केली जाणार आहे असेही दत्तात्रेय म्हणाले वास्तविक देवतळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर काँग्रेसमधील काही नेते आणि कार्यकर्त्यांचा एक गट दिल्लीला गेला होता. त्या कार्यकत्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना गोपनीय पत्र दिले. कार्यवाही पुढे ढकलण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुपारी प्रदेशाध्यक्षांना हे पत्र प्राप्त झाले. या पत्रानंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली, या संभाषणानंतरच प्रदेशाध्यक्षांनी आमदार धोटे यांच्याकडे पदभार सोपविला.

प्रकाश देवतळे यांच्यावर पत्र चोरल्याचा आरोप

एआयसीसीचे २९ मे रोजीचे पत्र पूर्णपणे गोपनीय होते. या पत्राची केवळ पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष पटोले आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांना माहिती होती. प्रकाश देवतळे यांनी ते एआयसीसी कार्यालयातून चोरले आहे आणि २० दिवसांनंतर मीडियावर लीक केले. ज्यामुळे पक्षाची बदनामी झाली. ही गोष्ट पूर्णपणे पक्षाच्या शिस्तीच्या विरुद्ध आहे. या संदर्भात देवतळे यांची अनुशासनहीनतेच्या आरोपावरून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यालयात अशाच तक्रारी केल्या आहेत. पक्षाकडून लवकरच वस्तूस्थिती उघड करून कार्यकत्यांमधील संभ्रम दूर केला जाईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी सतीश वारजूकर, दिनेश चोखारे, घनश्याम मूलचंदानी, विनोद अहिरकर यांची उपस्थिती होती.

Previous articleप्रतीक्षा संपली नागपूरसह चंद्रपुरात आज आकाशात ढग उद्या जोराचा पाऊस
Next articleपाणी पुरवठातील खाजगीकरणाच्या गैरसमज मनपा आयुक्त विपिन पालीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here