Home लक्षवेधी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करणाऱ्या ठाणेदार गावडे व  गुंड सोयामवर कारवाई करा.

माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करणाऱ्या ठाणेदार गावडे व  गुंड सोयामवर कारवाई करा.

वडिल विकास यांची मानवी हक्क आयोगाकडे मागणी. ठाणेदार यांच्या भूमिकांबद्दल आश्चर्य.

आष्टी न्यूज नेटवर्क :-

माझ्या पारिवारिक वादात सूरज सोयाम हा गुंड व आष्टी ठाणेदार कुंदन गावडे यांनी हस्तक्षेप करून मला घराबाहेर काढल्याने व माझ्या आठ वर्षीय तनुष्का या मुलीच्या अब्रूला आणि जिवाला धोका असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मानवी हक्क आयोगासह विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे विकास चिंचोलकर यांनी केली आहे. दरम्यान पारिवारिक वादात ठाणेदार कुंदन गावडे यांचा हस्तक्षेप कसा ? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

विकास यांचे स्वाती नावाच्या मुलीशी लग्न १७ मे २०१४ ला झाले व त्यांचा संसार जवळपास चार वर्ष सुखांचा होता आणि त्यांना कनिष्का नावाची आठ वर्षांची मुलगी आहे. पत्नी हि गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बैंक आष्टी येथे कार्यरत असतांना तिची लगाम या गावात बदली झाली आहे. दरम्यान ती अष्टविनायक कॉलनी आष्टी येथे राहत आहे. पण सूरज सोयाम नावाचा गुंड हा या दोघांच्या संसारात आग लावून विकास ला त्यांनी ठाणेदार गावडे च्या मदतीने घराबाहेर काढले आणि मुलीला बापापासून अलग केले असल्याने विकास ने याबाबत दोन महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

दरम्यान या तक्रारीत ठाणेदार गावडे यांचे नाव असल्याने गावडे यांनी विकास ला तुझी गाडी मिळवून देतो व तुला तुझ्या मुलीला पण भेटू देतो असे म्हणून स्वतःच्या बाजूने विकास कडून बयान घेतले आणि प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवले. ठाणेदार गावडे यांच्यावर विश्वास ठेवून विकास ने बयानातं ठाणेदार जबाबदार नसल्याचे लिहून दिले पण आता ठाणेदार विकास ला त्याचा हक्क मिळवून देण्यास टाळाटाळ करीत असल्याने विकास ने ठाणेदार यांच्या विरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करून माझ्या मुलीला कमीजास्त झाल्यास व तिच्या अब्रूला धक्का पोहचला तर ठाणेदार जबाबदार असेल असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here