Home Breaking News विनोद दत्तात्रेय यांनीच पत्र चोरून सार्वत्रिक केले

विनोद दत्तात्रेय यांनीच पत्र चोरून सार्वत्रिक केले

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय व सहकाऱ्यांनीच अखिल भारतीय काँग्रेस समितीने प्रदेशाध्यक्षांना पाठविलेले पत्र माध्यमात सार्वत्रिक केल्याचा पलटवार पदमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला. पत्र चोरीचा आरोप केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दत्तात्रेय व सहकाऱ्यांवर करणार आहे. दत्तात्रेय यांच्यासह त्यांच्या पत्रपरिषदेला उपस्थित कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठविणार आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीद्वारे नियुक्त अध्यक्ष मीच आहे. प्रदेश कांग्रेस समिती देखील आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष म्हणूनच पत्रव्यवहार करीत आहे. व्हिडीओ कॉन्फ्रेन्सच्या बैठकीला देखील मी उपस्थित होतो. महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या पत्रात देखील अध्यक्षपदाबाबतच्या स्पष्ट सूचना आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला कुठलीही नोटीस किंवा पत्र पाठविली नाही, असेही देवतळे म्हणाले.

Previous articleक्राईम :- भद्रावती तहसीलदारांनी पकडलेला रेतीचा ट्रक दुसऱ्या दिवशी सोडला ?
Next articleदखलपात्र :- वरोरा तालुक्यातील कोसरसार या गावांतील उपसरपंच अमित बहादुरेचा भ्रष्टाचार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here